भविष्य खजाना
मेष
भाग्याची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. विवाह उत्सुक व्यक्तींना अनुकूल काळ असेल. वैवाहिक जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करत असताना चर्चेचे रूपांतर भांडणात होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
उपाय मारुतीला तीन बुंदीचे लाडू अर्पण करावे
वृषभ
केलेल्या कामाचा योग्य तो परतावा मिळेल. मन जरी उत्साहाने भरलेले असले तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. खाण्यापिण्याच्या आवडींना जपाल. पण कुपथ्य होऊ देऊ नका. प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सध्या टाळलेला बरा. लहान भावंडांशी काही कारणाने मतभेद होऊ शकतात. नोकरीत पगारवाढ आणि कामाचे कौतुक होऊ शकते.
उपाय : देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा
मिथुन
स्वभावामध्ये थोडा बदल केला तर बरीच कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नाही. आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रमंडळी सोबत एखाद्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकाल. धनप्राप्ती सर्वसाधारण असेल. व्यावसायिकांनी जास्त अपेक्षा करू नयेत. या काळात कोणाचीही चेष्टा करायला जाऊ नका. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळेल.
उपाय : लहान मुलांना आंबट गोड मिठाई वाटावी
कर्क
तब्येतीला जपावे. बाहेरचे खाणे पिणे आरोग्य बिघडवू शकते. गॅसेस आणि पोट बिघडणे किंवा पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. कुटुंबातील काही व्यक्तींच्या आतताई स्वभावामुळे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. एखाद्या योजनेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्यता आहे सावध रहावे. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. छोट्या गुंतवणुकीतून लाभाची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगले अनुभव येतील.
उपाय : अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे
सिंह
रागावर नियंत्रण ठेवले नाही तर नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. आपल्या कृती आणि वाणीवर संयम ठेवलाच पाहिजे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर वैद्यकीय उपचार करून घेतले तर शीघ्र आराम मिळेल. या काळात पैशांच्या बाबतीत थोडी काळजी वाटू शकते. इन्कम कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती अनुभवायला येऊ शकते. प्रवासाचे उत्तम योग आहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल.
उपाय : केशर चंदनाचा टिळा लावावा
कन्या
संसर्गजन्य रोगांपासून सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार त्रास देऊ शकतात. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. अपेक्षा नाही अशा ठिकाणाहून आर्थिक मदत मिळू शकते. शेजाऱ्यांच्या मदतीमुळे एखादे काम पूर्ण कराल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चांगले संकेत आहेत. प्रेम संबंधात वाढ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे.
उपाय : गाईला गुळ चपाती खाऊ घाला
तूळ
प्रयत्नांना जर भाग्याची साथ मिळाली तर दुग्ध शर्करा योग होतो याची प्रचिती या काळात येण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रेचा योग होत आहे. मनात धार्मिक विचार येतील. तब्येतीची काळजी करू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रभावी वाणीने लोक आकर्षित होतील. प्रवासात चांगल्या घटना घडू शकतात. लेखी व्यवहारात यश मिळेल. जमीन आणि वाहन यादृष्टीने उत्तम योग होत आहेत. शेअर बाजारापासून दूर रहा. नोकरीत बेचैनी जाणवेल.
उपाय : कर्पूर होम करावा
वृश्चिक
तब्येतीच्या काही तक्रारी कमी झाल्यामुळे सुटकेचा श्वास घ्याल. आरोग्य चांगले झाल्याने उत्साहात वाढ होईल. कामे आत्मविश्वासपूर्वक कराल. ज्यामुळे पैशांचा प्रवाह चांगला असेल. परिवारात मागे घडलेल्या कटू घटना निवळल्याने आनंददायी वातावरण असेल. मनपसंत खाण्यापिण्याकडे तुमचा कल असेल. भावंडांकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारासारख्या गुंतवणुकीपासून दूर रहा.
उपाय : देवीच्या मंदिरात कोहाळ्याचे दान द्यावे
धनु
शैक्षणिक कार्याशी संबंधित लोकांना अनेक संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आरोग्याविषयी योग्य तो निर्णय घेऊन स्वस्थ राहण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. पैशाची आवक चांगली असेल. व्यावसायिकांना तेजीचा अनुभव येईल. प्रवास टाळणे अशक्य असेल तर पिवळी मिठाई खाऊन मग करावा. जमिनीचे व्यवहार तूर्तास टाळलेले बरे. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. नोकरी करणाऱ्यांना मनाविरुद्ध काम करावे लागेल.
उपाय : सुकलेले नारळ जलप्रवाहित करावे
मकर
उत्साहात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे पण प्रयत्नांची कास सोडू नये. आरोग्य चांगले राहील. व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक तंगी जाणवू शकते. कुटुंबात वाद होणार नाही त्याची काळजी घ्या. भावंडाबरोबर किंवा शेजाऱ्यांबरोबर असलेले नाते बिघडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. शेअर बाजारापासून धोका संभवतो. नोकरदार वर्गाला पगारवाढीची शक्यता आहे.
उपाय : उडदाचे दान द्यावे
कुंभ
वातावरणात आलेल्या बदलाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. लहान-मोठे आजार त्रास देतील. वैद्यकीय मदत घेण्यासाठी वेळ लावू नये. घरातील वातावरण काहीसे बिघडलेले जाणवेल. कागदोपत्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे असेल. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. वाहन दुरुस्तीची वेळ येऊ शकते. मौजमजेकडे जास्त लक्ष असेल. नोकरदार वर्गाने अधिकाऱ्यांशी मर्जी राखणे आवश्यक आहे.
उपाय : मंदिरात जोड केळ्याचे दान द्यावे
मीन
तुमच्या स्वभावाचा लोक गैरफायदा उचलणार नाहीत याची काळजी घ्या. दोस्ती खात्यात किंवा ओळखी खातर तुमच्याकडून कामे करवून घेतली जाऊ शकतात. तब्येत नाजूक असेल. पैशांची आवक तुलनेने कमी झाल्याने थोडी चिंता वाटू शकते. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात चांगले योग आहेत. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कारणास्तव प्रवासाचा विचार कराल. समाजात मानसन्मान मिळेल.
उपाय : गाईला पेढा भरवावा