For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटसाल क्लब फुटबॉल स्पर्धा आजपासून

06:53 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
फुटसाल क्लब फुटबॉल स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ बडोदा

Advertisement

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या तिसऱ्या फुटसाल क्लब चषक चॅम्पियनशिप  फुटबॉल स्पर्धेतला येथे शनिवारी प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 19 संघांचा समावेश राहिल.

शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन बडोदामधील स्वरनिम गुजरात क्रीडा विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा 16 दिवस चालेल. 7 जुलैला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाईल. सहभागी झालेले 19 संघ चार गटांमध्ये विभागले जात असून अ, ब आणि क गटात प्रत्येकी पाच संघांचा तर ड गटात चार संघांचा समावेश आहे. पहिल्या दोन फुटसाल क्लब चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दिल्लीमध्ये यशस्वीपणे भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण इंडियन फुटबॉलच्या यु ट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.