रुपयाच्या मूल्यात आणखीन घसरण
डॉलर्सच्या तुलनेत 77.72 इतके मूल्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय चलनाच्या मूल्यातील घसरण सुरूच आहे. एक अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आता 77.72 इतके झाले आहे. देशांतर्गत भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांना काढता पाय घेतल्याने रुपयाचे मूल्य घसरत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढविल्याने विदेशी गुंतवणूकदारांना आता अमेरिकेत गुंतवणूक करणे नफ्याचे वाटत असल्याने ही स्थिती ओढवली आहे.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंजमध्ये रुपयाचे मूल्य प्रति डॉलरच्या तुलनेत 77.72 पर्यंत पोहोचले आहे. दिवसभरात रुपयाच्या मूल्यात 10 पैशांची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे हे मूल्य सर्वात कमी ठरले आहे. मागील काही काळापासून चलनाच्या मूल्यात घसरण होत आहे. चलन मूल्यात घसरण होत असल्याने आयात महागल्याने विदेशी चलन साठय़ात घट होऊ लागली आहे. तर निर्यातदारांना मात्र चलनमूल्यातील घसरणीचा काही प्रमाणात लाभ होत आहे.