शरीराला नुकसान पोहोचविणारा फंगस
जागतिक आरोग्य संघटनेने आता एका अशा फंगसवरून इशारा दिला आहे, जो कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे. हा फंगस शरीराच्या आतून नुकसान पोहोचवितो आणि अत्यंत वेगाने वाढतो. हा अजब फंगस पूर्ण जगात फैलावत आहे. हा लवकरच ब्रिटनपर्यंत पोहोचू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे. सायन्स फिक्शन सीरिज द लास्ट ऑफ असप्रमाणे याला समजू शकता. या सीरिजमध्ये ज्याप्रकारे एका फंगल इंफेक्शनमुळे पूर्ण जग हळूहळू नष्ट होते, त्याचप्रकारे हा फंगस फैलावला तर माणसांसाठी मोठा धोका ठरणार आहे.
काय आहे हा फंगस
या फंगसचे नाव अॅप्सरगिल्लस फ्युमिगॅट्स असून तो अॅस्परगिल्लोसिस नावाच्या जीवघेण्या आजाराचे कारण ठरतो. हा फुफ्फुसांना संक्रमित करतो आणि मेंदूपर्यंत फैलावतो. यामुळे माणसाला गंभीर आजार अन् अखेरीस मृत्यूही होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने याला एक मोठा सार्वजनिक आरोग्य धोका ठरविले आहे. हा फंगस लवकरच उत्तर अमेरिका, युरोप, चीन आणि रशियात फैलावू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
किती धोकादायक
इन्व्हेसिव्ह अॅस्परगिल्लोसिसचा मृत्यूदर 85.2 टक्के आहे. 2022 मध्ये डब्ल्यूएचओने अॅस्परगिल्लस फ्लॉव्सला स्वत:च्या महत्त्वपूर्ण फंगल रोगजनकांच्या यादीत सामील केले होते. हा आरोग्यासाठी धोका आहे आणि औषधांबद्दल प्रतिरोधक असू शकतो. म्हणजेच हा उपचाररहित फंगस आहे. मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या एका नव्या अध्ययनात सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने अॅस्परगिल्लस फ्युमिगॅट्स 2100 पर्यंत 77 टक्के अधिक क्षेत्रांमध्ये फैलावू शकतो, ज्यामुळे लाखे लोक संक्रमणाला बळी पडू शकतात असा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.
फंगसची ओळख पटविणे अवघड
या फंगसला ओळखणे अत्यंत अवघड असून यावरील उपचारही कठिण आहे. हा उष्ण अन् आर्द्रतापूर्ण वातावरणात वाढत जातो आणि खतांचा ढीग, सडणारे कार्बनिक पदार्थ तसेच हवेत आढळून येतो. मँचेस्टर युनिव्हर्सिटीचे हे अध्ययन तीन धोकादायक अॅस्परगिल्लस प्रजाती (ए. फ्युमिगॅटस, ए. फ्लॉव्हज आणि ए. नायजर)चे अध्ययन वेगवेगळ्या हवामानात करण्यात आले. विषाणू आणि परजीवींच्या तुलनेत फंगसवर कमी संशोधन झाले आहे. भविष्यात फंगल इंफेक्शन जगाच्या बहुतांश हिस्स्यांना प्रभावित करू शकतात असे अध्ययनाचे मुख्य लेखक नॉर्मन वॅन रिजन यांनी म्हटले आहे.