कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार

06:34 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

त्यांच्या आवडत्या रोम चर्चमध्ये त्यांचे पार्थिव भूमीला अर्पण, जगभरातील मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था / व्हॅटिकन, रोम

Advertisement

जगभरातील रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यांच्या आवडत्या रोम चर्चमध्ये शाही सन्मानात त्यांचे पार्थिव ख्रिश्चन धर्मपद्धतीनुसार भूमीला अर्पण करण्यात आले. यावेळी जगभरातील राष्ट्रप्रमुखांची आणि मान्यवरांची उपस्थिती होती. चार लाख सर्वसामान्य नागरीकही या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांनी साश्रू नयनांनी आणि दु:खी अंत:करणाने आपल्या धर्मगुरुंना अंतिम निरोप दिला.

ज्या चर्चमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, त्याचे नाव सांता मारिया मॅगीओर बेसिलिका असे आहे. यावेळी जगभरातून आलेल्या कार्डिनल्सनी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. अंतिम प्रार्थना कार्डिनल जिओव्हानी बॅटीस्टा रे यांनी म्हटली. त्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोप फ्रान्सिस यांनी विश्वशांतीसाठी महान कार्य केले. समंजसपणा आणि प्रामाणिक संवाद यांच्या माध्यमांमधून जगातील सर्व संघर्षांवर उपाय शोधला जाऊ शकतो, असा त्यांचा संदेश होता, असे प्रतिपादन कार्डिनल रे यांनी केले.

अनेक देशांचे प्रमुख उपस्थित

अंत्यसंस्कारासाठी अनेक देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, इटलीच्या नेत्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, युव्रेनचे अध्यक्ष वालोदिमीर झेलेन्स्की, युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उर्सेला व्हॉन डर लिएन, स्पेनचे राजे फिलिप सहावे आणि त्यांच्या पत्नी लेटिझिया, जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमियर, इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनॅशिओ लुला द सिल्वा आदींचा समावेश होता.

पार्थिवाची मिरवणूक

पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव सेंट पीटर्स बासिलिका येथे शुक्रवारी सर्वसामान्यांच्या अंतदर्शनासाठी आणण्यात आले होते. लक्षावधी भाविकांनी त्याचे अंतिम दर्शन घेतले. शनिवारी सकाळी पार्थिवाला एका वाहनावरुन अंत्यसंस्कारस्थळी नेण्यासाठी त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. सेंट पीटर्स चर्च पासून साधारणत: चार किलोमीटरवर असलेल्या अंत्यसंस्कार स्थळापर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूंना उभे राहिलेल्या सहस्रावधी भाविकांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.

21 एप्रिलला मृत्यू

पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू वयाच्या 88 वर्षी वृद्धापकालीन व्याधींमुळे 21 एप्रिल 2025 या दिवशी झाला. त्यांनी 2013 पासून 12 वर्षे हे सर्वोच्च पद सांभाळले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चर्चसंस्थेत अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. चर्चच्या कार्यपद्धतीतही त्यांनी अनेक कालसुसंगत परिवर्तने केली. तृतियपंथियांना सन्मानाने वागविले जाणे आवश्यक असून त्यांच्याशी आपण सर्वांनी संवाद साधला पाहिजे, असे त्यांचे मत होते. जगातील संघर्ष टळावेत आणि सर्व देशांनी शांततेच्या मार्गाने संघर्षांवर उपाय शोधावा यासाठी यांनी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांची नोंद जगाने घेतली होती.

पुढचे पोप लवकरच

रोमन कॅथॉलिक चर्चच्या परंपरेनुसार पुढच्या पोपची निवड लवकरच केली जाणार आहे. यासाठी जगभरातील सर्व देशांमधून कार्डिनल्स व्हॅटिकन येथे जमणार आहेत. भारतातूनही चार कार्डिनल्स जाणार आहेत. या कार्डिनल्सच्या बैठकीत नव्या पोपची निवड केली जाणार आहे. जगभरातील 90 हून अधिक देशांमध्ये 250 हून अधिक कार्डिनल्स आहेत. कार्डिनल हे पद पोप या पदाच्या खालोखालचे आहे. कार्डिनल्सची नियुक्ती पोप यांच्याकडून केली जाते. नव्या पोपचे नाव ‘कम क्वेव्ह’ (किल्ली) च्या माध्यमातून घोषित केले जाण्याची पद्धत आहे.

साश्रू नयनांनी पोपना निरोप

ड पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधीसाठी जगभरातून चार लाख लोक उपस्थित

ड अनेक देशांचे प्रमुख आणि जगभरातील मान्यवर व्यक्तीमत्वांचीही उपस्थिती

ड पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी 21 एप्रिलला घेतला अंतिम श्वास

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article