Ajit Pawar | उद्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादांचे अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
मुंबई : बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणिकॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले.
महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) नुसार, उद्या गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी 11 वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. राज्यात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बारामतीमध्ये लँडिंग होण्यापूर्वीच अजित पवार यांचे विमान कोसळले. अजित पवार आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये तीन जाहीर सभांना उपस्थित राहणार होते.
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
अजित पवार यांचं पार्थिव आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते नेते बारामतीत दाखल होत आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या (२९ जानेवारी २०२६) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत येणार असल्याची माहिती
अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाईल.