महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जवान तुषार घाडगे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : बोरगाव सह परिसरात शोककळा

05:27 PM Aug 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
Jawan Tushar Ghadge
Advertisement

वाठार किरोली वार्ताहर

कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जवान तुषार राजेंद्र घाडगे (वय ३३) यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

Advertisement

"अमर रहे.. अमर रहे... शहीद जवान अमर रहे!", "जब तक सूरज चाँद रहेगा...जवान तुषार घाडगे आपका नाम रहेगा" अशा घोषणा देत जवान तुषार घाडगे यांची गावातून जड अंतकरणाने शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली.

Advertisement

बोरगाव गावचे सुपुत्र GREF आर्मी मधील तुषार राजेंद्र घाडगे व त्यांचे दोन सहकारी दुपारी १.३० च्या सुमारास भारतीय सैन्याकरीता रस्ता बनविण्याच्या कामात ड्रीलिंग चे काम करीत होते. दुपारी १.४५ वाजता अचानक झालेल्या भूस्खलनामध्ये 116 RCC मधे spm Rock ६० मीटर स्लाइड पॉइंट मधे एक स्लाइड आला आणि त्यामधे तुषारच्या डोक्यात दगड लागला त्याला टीप्पर मधून RCC मधे आणले आणि नंतर ambulence मधून hospital घेऊन जात असताना तो मयत झाला. त्याच्या एका सहकाऱ्याला उपचारासाठी आसाम दिब्रुगड येथे हलवले असून दुसरा साथीदाराला किरकोळ दुखापत झाली आहे.

आपल्या गावच्या वीर जवानाला भारतमातेकरीता कर्तव्य बजावत असताना वीर मरण पत्करावे लागले. तुषारच्या पश्चात त्याचा मोठा भाऊ विशाल हा देखील भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे. त्याची आई पत्नी व ३ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.राष्ट्राच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जे रस्ते बांधणीचे काम चालू होते त्यावेळी तुषार चे झालेले बलिदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. परंतु, त्याच्या पत्नी,आई व कुटुंबाला झालेले दुःख देखील गहिवरून आणणारे आहे.

शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव बोरगाव येथे सैन्यदलाच्या ताफ्याबरोबर आणण्यात आले. यावेळी गावातील युवकांनी रहिमतपूर ते बोरगाव पर्यंत दुचाकी रॅली काढली. प्रथम त्यांच्या राहत्या घरासमोर पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर पार्थिव झेंडूच्या फुलांनी व हारांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून स्मशानभूमित आणण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे ,जब तक सूरज चांद रहेगा शहीद जवान तुषार घाडगे आपका नाम रहेगा आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोरगाव, वाठार, रहिमतपूर परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. बोरगाव येथील स्मशानभूमीमध्ये कोरेगाव तालुक्यातील शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील अधिकारी व सैनिक आदींनी जवान तुषार घाडगे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जवान तुषार घाडगे यांना कुटुंबियांच्या उपस्थितीत मुखाग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
Funeral of Jawan Tushar Ghadgesatara news
Next Article