महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यावर अंत्यसंस्कार

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाखेंची गर्दी : भारतासह 68 देशांचे नेते उपस्थित : तालिबान-हमासच्या नेत्यांचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था /तेहरान

Advertisement

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे 19 मे रोजी संध्याकाळी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मशहद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव मशहद शहरात आणल्यानंतर अंत्ययात्रेत लाखो लोकांची उपस्थिती दिसून आली. तसेच जगभरातील सुमारे 68 देशांचे नेते आणि राजनयिक उपस्थित असल्याचे इराणच्या सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. भारताच्यावतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे इराणमध्ये दाखल झाले होते. रईसी यांचा जन्म झालेल्या मशहद शहरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार गुऊवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय मशहद विमानतळावर पोहोचले. त्यांच्या अखेरच्या निरोपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून लाखो लोक मशहद शहरात पोहोचले होते. याप्रसंगी लोकांनी हातात इराणचा झेंडा आणि रईसींचा फोटो घेतला होता. रईसी यांना अंतिम निरोप देण्यासाठी तालिबानचे उपपंतप्रधान मुल्ला बरादर, हमासचे राजकीय नेते इस्माईल हनीये आणि हुथी बंडखोरांचे प्रतिनिधीही पोहोचले होते. त्यांच्याशिवाय कतारचे अमीर तमीम बिन हमाद अल थानी, इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि अनेक देशांचे राष्ट्राध्यक्षही सहभागी झाले होते. इराणचे हंगामी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुखबेर, अंतरिम परराष्ट्रमंत्री अली बघेरी कानी आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी परदेशी नेते आणि अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

इराणी लोक काळे कपडे परिधान करून सहभागी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या नेतृत्वाखाली इब्राहिम रईसी आणि इतर अधिकाऱ्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली होती. त्यांनी रईसींसाठी प्रार्थना केली. ते पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक तेहरानला पोहोचले होते. काळे कपडे परिधान केलेले इराणी नागरिक पार्थिवासह काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यानंतर तेहरान विद्यापीठात हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शवपेट्या ठेवण्यात आल्या. या शवपेट्या इराणच्या ध्वजात गुंडाळलेल्या होत्या. त्यावर मृतांची छायाचित्रे चिकटवण्यात आली होती. तेहरानमधील शेवटच्या निरोप समारंभात इब्राहिम रईसी यांचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर रईसी यांचा उल्लेख ‘हुतात्मा’ असा करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article