For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ - मालवणातील रस्ते कामांसाठी कोटींचा निधी

12:44 PM Oct 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ   मालवणातील रस्ते कामांसाठी कोटींचा निधी
Advertisement

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निलेश राणे यांनी सभागृहात उठवला होता आवाज

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

कुडाळ व मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग अशा एकूण - 36 रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने एकूण 6 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यात कुडाळ मालवण, कसाल मालवण, पणदूर घोटगे रस्ता या मुख्य रस्त्याचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे कोकणातील रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नसून कोकणात पडणारा प्रचंड पाऊस हा निकष लावून कोकणातील सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ असणाऱ्या रस्त्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाजवळ केली होती त्या नुसार कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण 36 रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 6 कोटी 95 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीनंतर तत्काळ निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले असून आता लवकरच निविदा प्रक्रिया होऊन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.