कोरोना काळातील पीएम- केअर्स फंड मध्ये अजूनही जमा होतात पैसे
आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
२०२१-२२ च्या तुलनेत या आकड्यात १५ टक्क्यांनी वाढ
दिल्ली
पीएम केअर्स फंड ची स्थापना २७ मार्च २०२० रोजी झाली. जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाल्यावर दिवसांनी पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात स्थापित करण्यात आलेला PM CARES फंड अद्यापही सक्रिय आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर देणग्या येत आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरीस या फंडातील शिल्लक रक्कम ६,२८४ कोटी इतकी होती. तर २०२१-२२ च्या अखेरीस ५,४१६ कोटी रुपये होती. २०२१-२२ च्या तुलनेत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०२२-२३ मध्ये फंडमध्ये जमा झालेल्या देणग्या
२०२२-२३ मध्ये PM-CARES फंडाला एकूण ९१२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळल्या आहेत. त्यामध्ये ९०९.६४ कोटी रुपयांची देणग्या ही स्वैच्छिक आहेत. तर २.५७ कोटी रुपये इतका परदेशातून आलेल्या देणग्यांचा समावेश आहे. याशिवाय या फंडाला १७०.३८ कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. यामध्ये नियमित खात्यांवर १५४ रुपये व परदेशी योगदान खात्यांवर १६.०७ कोटी रुपये इतके व्याज मिळाले आहे.
PM-CARES फंड
२७ मार्च २०२० रोजी, सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यानंतर तीन दिवसांनी PM-CARES फंडची स्थापना करण्यात आली. या फंडाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि यापरिस्थितीशी झगडणाऱ्यांना मदत पुरवण्यासाठी होता. या फंडाचे अध्यक्ष देशाचे पदसिद्ध पंतप्रधान असून, संरक्षण मंत्री, गृह मंत्री आणि वित्त मंत्री हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. यासोबत न्यायमूर्ती के. टी. थॉमस (सेवानिवृत्त) आणि कार्यिया मुंडा यांना या फंडाचे विश्वस्थ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.