For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिवूडमध्ये पुनरागमनासाठी निधी सज्ज

06:53 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडमध्ये पुनरागमनासाठी निधी सज्ज
Advertisement

चित्रपटाद्वारे ओटीटीवर करणार पदार्पण

Advertisement

अभिनेत्री निधी अग्रवाल पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. निधी 2017 मध्ये टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुन्ना मायकल या चित्रपटात दिसून आली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. यानंतर निधीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोर्चा वळविला होता. दक्षिणेत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. निधी आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये परतणार आहे.

निधी यावेळी ओटीटीवर दिसून येणार आहे. निर्मात्या प्रेरणा अरोरा यांच्या ‘अकीडो : ए रिव्हेंज ड्ऱामा’ चित्रपटाद्वारे निधी ओटीटीवर पदार्पण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जयस्वाल यांनी केले आहे. इतक्या चांगल्या कहाणीला मी नकार देऊ शकले नाही. अशा स्थितीत प्रेरणा यांनी मला फोन केल्यावर मी त्वरित होकार दर्शविल्याचे निधीने सांगितले आहे.

Advertisement

सध्या मी तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे. एका छोट्या ब्रेकनंतर आणि दक्षिणेत चांगले काम केल्यावर मी हिंदी चित्रपटांमध्ये परतत आहे. तेलगूत मी अलिकडेच पवन कल्याण यांच्यासोबत ‘हरि हर वीरा मल्लू’ आणि प्रभासोबत ‘राजा साब’ चित्रपटात काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये मी मुख्य भूमिका साकारली आहे. हे दोन्ही चित्रपट चालू वर्षातच प्रदर्शित होणार असल्याचे निधीने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.