For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ , मालवणात ट्रान्सफॉर्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी

04:19 PM Feb 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ   मालवणात ट्रान्सफॉर्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी
Advertisement

सिंधुरत्न समृद्ध योजनेची बैठक संपन्न

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झालाअसुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील वीज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती. त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन तर मालवण तालुक्यातील सात अशा एकूण दहा ट्रान्सफॉर्मरना मंजुरी दिली आहे. यात देवबाग मोबारवाडी ट्रान्सफार्मर, मालवण फोवकांडा पिंपळ येथे 100 केव्ही ट्रान्सफार्मर, सर्जेकोट येथे 100 केव्ही ट्रान्सफार्मर, वायरी भुतनाथ येथे 100 केव्ही ट्रान्सफार्मर, कांदळगाव परबवाडा येथे 10 0केव्ही 6 ट्रान्सफार्मर DTC व 11 केव्ही लाइन उभारणे, खैदा घुमडे येथे 100केव्ही ट्रान्सफार्मर बसवणे, मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे 100 KVAट्रान्सफार्मर बसवणे, गवळीवाडी नजीक, कुंभारमाठ येथे २०० KVA ट्रान्सफार्मर बसवणे, रांगणातुळसुली कदमवाडी येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर बसवणे, बाव आंबेडकरनगर येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर उभारणे, आंदुर्ले दाभोलकरवाडी येथे 100 KVA DTC बाव ट्रान्सफॉर्मर या ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.