दक्षिणमधील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी आमदार अमल महाडिक
प्रभाग क्रमांक 58, 59 मध्ये एक कोटींच्या विकास कामांना प्रारंभ
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी भरीव निधी आणणार आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे माजी आमदार अमोल महाडिक यांनी सांगितले.
माजी नगरसेवक किरण नकाते आणि माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 58 आणि 59 मध्ये विविध विकास कामे होत आहेत. अंतर्गत रस्ते गटारी तसेच अन्य विकास कामांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून 97 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकास कामांना माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी नकाते दांपत्याने जपलेल्या लोकसभेचा वारसा खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही सांगितले. याप्रसंगी प्रभागातील विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी माजी आमदार महाडिक यांचा सत्कार केला.
यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम,भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, अमर नकाते, रघुनाथ शेळके, बाबसो जाधव, रमेश लाड, विमल पाटील, ज्ञानदेव पाटील, सविता पदारे, ज्योती नकाते, रजनी मयेकर, रुपाली पोवार, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.