For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोली, अगसगा, हंदिगनूर भागाच्या विकासासाठी निधी मंजूर

10:39 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोली  अगसगा  हंदिगनूर भागाच्या विकासासाठी निधी मंजूर
Advertisement

कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन

Advertisement

वार्ताहर /कडोली

सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री आणि यमकनमर्डी मतदार क्षेत्राचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कडोली, केदनूर, अगसगा, हंदिगनूर, बोडकेनट्टी आदी भागातील विकासकामांना पुन्हा एकदा चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिल्याने कडोली परिसरात समाधान व्यक्त होत आहे. विकासकामांचे ध्येय समोर ठेवून यमकनमर्डी क्षेत्राचा कायापालट करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विकासकामे राबविण्यासाठी पुन्हा जोर दिला आहे. युवा नेता राहुल जारकीहोळी, केपीसीसी सदस्य व स्वीय सचिव मलगौडा पाटील आणि सहकाऱ्यांनी कडोली जि.  पं. क्षेत्रात विविध ठिकाणी भूमिपूजनाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. गुंजेनहट्टी ते हंदीगनूर, कडोली, अगसगा, गुंजेनहट्टी, जाफरवाडी पांदी ते गौंडवाड या सुमारे 9 कोटी 20 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. तसेच अगसगा सीसी रस्त्यासाठी 50 लाख रु., अगसगा ते केदनूर रस्त्यासाठी 50 लाख, हंदिगनूर सी. सी. रस्त्यासाठी 70 लाख, बोडकेनट्टी येथे वाल्मिकी भवनासाठी 20 लाख, चिकित्सा केंद्रासाठी 58 लाख, कुरीहाळ येथील सी. सी. रस्त्यासाठी 30 लाख असे एकूण 2 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. शिवाय कडोली आणि केदनूर गावातील सी. सी. रस्त्यासाठी अनुक्रमे 60 आणि 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.  मार्कंडेय नदी ते भरम तलाव लिफ्ट इरिगेशन योजना, मार्कंडेय नदीला बंधारे बांधल्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.