फुकेरी हनुमंत गड दिंडी दरवाजा स्वच्छता मोहीम ५ व ६ एप्रिल रोजी
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 'घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा' या मोहिमेअंतर्गत प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने फुकेरी येथील किल्ले श्री हनुमंत गडावर शनिवारी ५ व ६ एप्रिल रोजी दिंडी दरवाजा स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवकालीन गौरवशाही ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हनुमंत गडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वीही या गडावर अनेक स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या असून या गडावरील ऐतिहासिक तळीमधील गाळ काढून स्वच्छ करण्यात आली होती. गडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. ज्या दुर्ग सेवक व दुर्गसेविकांना या दिंडी दरवाजा स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता हनुमंत गडाच्या पायथ्याशी फुकेरी माऊली मंदिर या ठिकाणी एकत्र यायचे आहे. या मोहिमेच्या अधिक माहितीसाठी 94047 59110 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन या स्वच्छता मोहिमचे प्रमुख दिनेश सावंत आणि मेघनाथ आईर यानी केले आहे.