For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

128 चोरी प्रकरणांतील फरारी चोरट्याला जेरबंद

11:09 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
128 चोरी प्रकरणांतील फरारी चोरट्याला जेरबंद
Advertisement

कारवार शहर पोलिसांना यश : सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त

Advertisement

कारवार : येथील अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या केलेल्या चोरीप्रकरणी आणि राज्य-आंतरराज्य 128 चोरीप्रकरणी फरार झालेल्या सराईत चोरट्याला ताब्यात घेण्यात कारवार शहर पोलिसांना यश आले. ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव सुमीर ऊर्फ गुल्लू, ऊर्फ शाम, ऊर्फ जॉन, ऊर्फ समीर सतपाल शर्मा (वय 40) (रा. बनशंकरी श्रीनगर दक्षिण बेंगळूर येथे खासगी नोकरी, सद्याला वास्तव्य दुर्गा केरी होन्नावर आणि मूळचा राममुंडी ग्राम, जालंधरनगर, पंजाब) असे आहे. त्याला 11-11-2024 रोजी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पंजाबमधील अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ ताब्यात घेतले आहे. चोरट्याकडून सुमारे दोन लाख किमतीचे 34.026 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन लाख रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, 7 नोव्हेंबर रोजी येथील आश्रम रोडवर असलेल्या अभिमान श्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये दिवसा चोरी झाल्याची तक्रार फ्लॅटच्या मालकीन प्रिया अँथोनी फर्नांडिस यांनी कारवार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते आणि चोरीचा छडा लावण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली होती. चोरी संदर्भात योग्य ते धागेदोरे हाती लागल्यानंतर कारवार शहर पोलिसांनी अमृतसर शहर गाठले आणि फिल्मीस्टाईलने पाठलाग करून मुसक्या आवळल्या.

Advertisement

बेंगळूरमधील वेगवेगळ्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 106 चोरीप्रकरणी गोव्यातील वेगवेगळ्या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 चोरीप्रकरणी, उत्तर प्रदेशमधील नोयडा येथील विविध 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 चोरीप्रकरणी आणि पंजाबमधील 2 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 4 अशा एकूण 128 चोरीप्रकरणी तो पेलिसांना हवा होता. विविध न्यायालयामध्ये चोरट्यावर 34 प्रकरणी प्रोक्लेमेशन वॉरंट, 34 प्रकरणी जामीन रहीत वॉरंट बजावण्यात आले आहे. उरलेल्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. ही कारवाई कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख सी. टी. जयकुमार आणि जगदीश एम., पोलीस अधिकारी एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अधिकारी रमेश हुगार, राघवेंद्र नाईक, संतोष जाधव आदी सहभागी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.