For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात इंधन पुरवठा सुरळीत

02:48 PM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात इंधन पुरवठा सुरळीत
Advertisement

नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर यांची माहिती

Advertisement

पणजी : गोवा राज्यातील पेट्रोल, डिझेल आणि घरगुती (एलपीजी) गॅस सिलिंडर अशा सर्व प्रकारच्या इंधनांचा पुरवठा मागणीनुसार स्थिर, पुरेसा व सुरळीत झाला असल्याची माहिती नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर यांनी दिली. पर्वरी सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मागणी व पुरवठा यांची सांगड घालून आणि तुलना करुन त्यात तफावत राहू नये म्हणून योग्यवेळी योग्य पावले उचलण्यात येत असून सर्व इंधन पुरवठा आता नियंत्रणात आला आहे. इंधन मिळत नसल्याच्या सर्व तक्रारी आता निकालात निघाल्या असून त्याचा अखंडित पुरवठा होत असल्याने काही दिवसांपूर्वी उद्भवलेली इंधन टंचाई किंवा ते मिळत नसल्याच्या तक्रारी आता संपुष्टात आल्या आहेत. इंधन पुरवठा परिस्थिती सामान्य व सुरळीत झाली असून पुरवठ्यामध्ये स्थिरता आली असल्याचा दावा गडकर यांनी केला आहे.

पीएनजी सेवेचा लाभ घ्या

Advertisement

प्रतिदिन 10 हजार पेक्षा जास्त घरगुती गॅस सिलिंडर वितरित केले जात असून वितरणाची सदर पातळी आता सामान्य आहे. इंधनाला दुसरा पर्याय म्हणून पीएनजी (पीईप नॅचरल गॅस) जोडणी लोकांनी घ्यावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारतर्फे उत्तेजन देण्यात येत असून त्यास बरा प्रतिसाद मिळत आहे. पणजी, मडगाव, फोंडा इत्यादी भागात पीएनजी सेवा उपलब्ध करण्यात आली असून ती घेण्याचे आवाहन गडकर यांनी केले आहे.

परप्रांतीय कामगार आणि विद्यार्थीवर्ग ज्यांच्याकडे स्थानिक पत्ता असलेला पुरावा नाही त्यांना 5 किलोग्रॅमचा सिलिंडर पुरवण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. एप्रिल 2026 पर्यंत अशा प्रकारचे 11 हजार सिलिंडर देण्यात आले. व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा सरकारी आदेशानुसार 60 टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. आखाती युद्धापूर्वी सिलिंडर आरक्षित नोंदणी प्रतिदिन 11 हजारच्या आसपास होती. ती युद्धानंतर 13 हजारपर्यंत वाढली आणि आता एप्रिल 2026 पर्यंत 9 हजार झाल्याची माहिती त्यांनी दिली. इंधन पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम असल्याचे गडकर यांनी पुढे सांगितले.

Advertisement
Tags :

.