कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उन्हाचा तडाख्यात वधारले फळांचे दर

04:15 PM May 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी : 

Advertisement

उन्हाचा पारा 39 ते 41 अंशावर पोहचला आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे फळांच्या आवेकवर परिणाम होत आहे. बाजारात फळांची आवक कमी होत आहे. सफरचंद, डाळींब, केळी, संत्रीच्या दरात 50 टक्क्यांनी वाढले आहेत. उन्हामुळे रसाळ फळांना मागणी वाढली आहे. त्यातच आवक घटली असल्याने फळांची मागणी वाढली आहे.

Advertisement

हापूस आंब्याची आवक रोज सुरू असली तरी याचे दर अजुनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये बुधवारी 400 ते 600 रूपये प्रतिडझन अशी विक्री सुरू होती. तर शहरासह उपनगरातील प्रमुख मार्गावराच्या दुतर्फा थेट बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. टेंपो व चारचाकी वाहनातच आंब्याचे स्टॉल लावले आहेत. यामध्ये रत्नागिरी, देवगड, कर्नाटक येथील विक्रेते व बागायतदारांनी जागोजागी स्टॉल लावले आहेत.

गत बुधवार दि. 29 एप्रिल रोजी बाजार समितीत हापूस आंब्याचे 14 हजार 456 बॉक्स दाखल झाले होते. या आठवड्यात बुधवार दि. 7 रोजी 10 हजार 591 बॉक्स दाखल झाले आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत याची आवक घटली आहे. लालबागचा आंबा दाखल झाल्यामुळे हापूसचे दर स्थिर आहेत.

केळ्यांचे दर वाढले असुन लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे. बाजारात वसई केळी 30 ते 50 रूपये व जवारी केळी 50 ते 80 रूपये डझन अशी विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात 900 रूपये कॅरेट असा दर आहे. याची आवक घटत आहे. पुढील आठवड्यात याचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

देशी सफरचंदचा हंगाम संपला असल्याने बाजारात न्युझीलंड, इराण, साऊथ आफ्रिकेतून सफचंदांची आवक होत आहे. गत आठवड्याच्या तुलनेत सफरचंदच्या दरात किलोमागे 50 ते 60 रूपयांची वाढ झाली आहे. इराणच्या सफरचंदांची रेलचेल असुन याचे दर 200 रूपये प्रतिकिलो असा. न्यूझीलंडचा रॉयल गाला 250 तर साऊथ आफ्रिकेचा पँड्रीव 200 ते 220 रूपये प्रतिकिलो. असा दर आहे.

आरोग्यदायी डॅगन फळ बाजारातून गायब झाले आहे. शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी केवळ 8 बॉक्स दाखल झाले. एक किलो बॉक्सप्रमाणे केवळ 8 किलो ड्रॅगनची आवक झाली आहे. 300 रूपये प्रतिकिलो असा त्याचा दर आहे. अंजीर पाठोपाठ अननसची आवक मंदावली आहे.

उन्हाचा चटका वाढला आहे. अंगाची लाहीलाही होत असताना शरीराला गारवा मिळण्यासाठी नागरिकांकडून शीत पेयांसह रसाळ फळांना मागणी अधिक आहे. आंब्यासह, डाळींब, अननस, संत्री, पपई, चिकू आदी फळांचे दर वाढले असले तरी मागणीत वाढ होत आहे. फळ बाजारात फळांची उलाढाल वाढली आहे.

फळाचे नाव आवक किरकोळ दर (किलोमध्ये)

आंबा हापूस : 10 हजार 591 बॉक्स 400 ते 700 डझन

लालबाग आंबा : 2800 बॉक्स 100 रूपये किलो

तोतापूरी आंबा : 100 कॅरेट 20 ते 30 रूपये नग

संत्री : 15 कॅरेट 80 ते 100 रूपये

चिक्कू : 409 पोती 50 ते 60 रूपये

पेरू : 70 कॅरेट 60 ते 100 रूपये

सफरचंद विदेशी : 75 बॉक्स 200 ते 250 रूपये

सफरचंद : डेलीसीया 20 बॉक्स 200 ते 220 रूपये

डाळींब : 20 कॅरेट 150 ते 200 रूपये

अंजीर : 10 बॉक्स 350 ते 400 रूपये

अननस : 160 डझन 40 ते 80 रूपये नग

कलिंगड : 450 कॅरेट 30 ते 120 रूपये नग

ड्रॅगन : 8 बॉक्स 200 रूपये

केळी वसई : 1 टन 40 ते 60 रूपयें डझन

टरबुज : 10 कॅरेट 40 ते 70 रूपये नग

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article