For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीत उद्यापासून फळ महोत्सवाचे आयोजन

05:39 PM Sep 18, 2025 IST | Radhika Patil
सांगलीत उद्यापासून फळ महोत्सवाचे आयोजन
Advertisement

सांगली :

Advertisement

राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली यांनी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळ महोत्सव-२०२५ चे आयोजन दि.१९ सप्टोंबर ते २१ सप्टेबर या कालावधीत केले आहे. तीन दिवसांचा फळ महोत्सव पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृतीभवन, मार्केट यार्ड, सांगली येथे आयोजित केला आहे. महोत्सवाचे उद्घाटन १९ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी, अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, पणन अधिकारी ओंकार माने हे उपस्थित असणार आहेत.

Advertisement

असणार आहेत. या सांगली जिल्ह्यातील महोत्सवात ड्रॉगनफ्रुट, डाळींब, पेरू, सिताफळ व इतर फळ उत्पादक शेतकरी यांना फळ विक्री करीता मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ड्रॉगनफ्रुटचे फायदे म्हणजे कमी वेळेत पांढऱ्या पेशी वाढविण्यात, पचनक्रिया सुव्यवस्थित करणे, रक्तवाढी, डोळे व सांधे आजारावर गुणकारक आहे. महोत्साव सांगली शहर वासियांनी भेट देऊन फळांचा अस्वाद घ्यावा, असे पणन मंडळाचे डॉ. सुभाष घुले यांनी आवाहन केले.

Advertisement
Tags :

.