For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फळपीक विमा नोंदणीची मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढली

03:35 PM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
फळपीक विमा नोंदणीची मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढली
Advertisement

निलेश राणे यांनी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

फळपीक विमा नोंदणीची मुदत आज वाढवत राज्य शासनाकडून ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेत सर्व्हर डाऊन व इतर कारणांमुळे फळपीक विमा भरू शकत नसल्याची माहिती दिली होती. ३० नोव्हेंबर शेवटची तारीख असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण येथे आले असता भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्याशी चर्चा करत ही मुदत १५ दिवसांनी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी सचिवांना तत्काळ निर्देश देत ही मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा भरलेला नाही. त्यांनी तत्काळ पीक विमा भरण्याचे आवाहन भाजपा नेते निलेश राणे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.