Solapur News | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये फळांची आवक वाढली
03:38 PM Feb 25, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांची मोठी आवक
Advertisement
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात कलिंगड, खरबूज आणि चिकूचा भरपूर समावेश होत असून लहान व्यापाऱ्यांची मोठ्या होलसेल व्यापाऱ्यांकडे मागणी वाढलेली दिसून येत आहे.
पहाटेपासूनच फळ खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी वाढत आहे. विशेषतः ब्लॅक ग्रेप्स, अंजीर, डाळींब, मोसंबी आणि चिकूला मोठी मागणी आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे रसाळ आणि ताज्या फळांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
Advertisement
सध्या बाजारात डाळींब सर्वाधिक दराने विकले जात असून कलिंगड सर्वात स्वस्त उपलब्ध आहे. तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत फळांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Advertisement