For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून गोव्यात ‘सियावर रामचंद्र की जय’

03:02 PM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजपासून गोव्यात ‘सियावर रामचंद्र की जय’
Advertisement

तीन दिवसात चार ठिकाणी महानाट्या प्रयोग : मुलांबरोबर पालकांनाही मिळणार मोफत प्रवेश

Advertisement

पणजी : उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांना धमाल तसेच पौराणिक, वैचारिक महानाट्याकृती पाहण्याची संधी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि दैनिक तरुण भारत यांच्या सहकार्याने आजपासून मिळत आहे. आज दि. 16 ते दि. 18 मे रोजीदरम्यान पुणे येथील राधिका क्रिएशन्सच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बाल महानाट्याचे चार प्रयोग गोव्यात होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांबरोबर पालकांनादेखील हे नाटक पाहण्याची संधी मिळणार आहे. नाटकात 58 बालकलाकारांचा सहभाग आहे. हे महानाट्या पुणे, नागपूर, मुंबई येथे गाजले आहे. गोव्यात आजपासून पणजी, साखळी, काणकोण तसेच फोंडा येथे होणार आहेत. आज दि. 16 रोजी सकाळी 10 वा. कला अकादमी पणजी येथे उद्घाटनाचा पहिला प्रयोग होईल.

त्यानंतर आजच सायं. 6 वा. रवींद्र भवन साखळी येथे, रविवार दि. 17 रोजी स. 10 वा. रवींद्र भवन काणकोण, तर दि. 18 रोजी सायं. 6 वा. राजीव कला मंदिर फोंडा येथे हे महानाट्या सादर केले जाणार आहे. संपूर्ण रामायण हे दोन तासांमध्ये मुलांना दाखविले जाईल. उन्हाळी सुट्टीमध्ये हे महानाट्या म्हणजे मुलांसाठी फार मोठी पर्वणी ठरणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने या कार्यक्रमाला फार मोठे सहकार्य केले असून दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून ही नाट्याकृती आणि त्यातील आशय व भावार्थ गोव्यातील मुलांपर्यंत व युवा पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने चारही ठिकाणी हे महानाट्या मोफत दाखविण्यात येणार आहे. या महानाट्याचे पासेस लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या स्थानिक शाखांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. राधिका दारवेकर यांची निर्मिती असलेल्या या महानाट्याचे दिग्दर्शन राधिका देशपांडे यांनी केले आहे. गोव्यातील मुलांसाठी हे खास आकर्षण ठरणार आहे.

Advertisement

बाल महानाट्या प्रयोग...

  • शनिवार, 16 मे स. 10 वा. कला अकादमी, पणजी
  • शनिवार, 16 मे सायं. 6 वा. रवींद्र भवन, साखळी
  • रविवार, 17 मे स. 10 वा. रवींद्र भवन, काणकोण
  • सोमवार, 18 मे सायं. 6 वा. राजीव कला मंदिर, फोंडा
Advertisement
Tags :

.