For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून गृहलक्ष्मींच्या खात्यात एक हप्ता होणार जमा

10:01 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजपासून गृहलक्ष्मींच्या खात्यात एक हप्ता होणार जमा
Advertisement

महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती : वित्त खात्याकडून गृहलक्ष्मी योजनेचा 24 वा हप्ता जारी

Advertisement

गृहलक्ष्मी...

  • 1.26 कोटी गृहलक्ष्मीच्या खात्यात पैसे जमा होणार
  • फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील हप्त्याबाबत स्पष्टीकरण नाही
  • खात्याकडून नवे सॉफ्टवेअर विकसित

बेंगळूर : सोमवारपासून प्रत्येक घरातील गृहलक्ष्मींच्या खात्यात एका हप्त्याची रक्कम जमा केला जाईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव येथे झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गृहलक्ष्मी निधी देण्याच्या मुद्द्याबाबत मंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. याबाबत मंत्र्यांनी माफी मागितली तरी विरोधी पक्षांनी सभागृहात गोंधळ घातला होता. त्यानंतर रविवारी मंत्री हेब्बाळकर यांनी वरील विधान आले आहेत.

Advertisement

रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या,  मी नेहमीच हप्ता जमा करण्यापूर्वी माहिती देतो. महिन्याचे नाव सांगणार नाहीत. यापूर्वीच वित्त खात्याने गृहलक्ष्मी योजनेचा 24 वा हप्ता जारी केला आहे. सोमवारपासून पुढील शनिवारपर्यंत 24 व्या हप्त्याची रक्कम संबंधित गृहलक्ष्मींच्या खात्यात जमा केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आजपासून 1.26 कोटी गृहलक्ष्मीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे देण्याबाबत मंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.

गृहलक्ष्मी योजनेचे पैसे मृतांच्या खात्यात जमा करण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वाखाली दोनवेळा बैठक झाली आहे. मृतांच्या खात्यात पैसे जमा झाल्यास ते समजून येत नाही. त्यामुळे आता खात्याकडून आम्ही नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. अंगणवाडी सेविका मृत्यू प्रमाणपत्रांची पडताळणी करतील. त्यामुळे आम्ही ते सध्यासाठी स्थगित केले आहे. खात्यात चुकीच्या पद्धतीने जमा झालेले पैसे वसूल करण्याची जबाबदारी आम्ही काही बँकांना दिली आहे, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

विकासासाठी बेळगावचे विभाजन आवश्यकच

बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनावर बोलताना त्या म्हणाल्या की, बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या मनात प्रस्ताव आहे. एकता आणि विकासासाठी जिल्ह्याचे विभाजन करणे आवश्यक आहे. बेळगाव तालुक्मयात 11.5 लाख लोकसंख्या आहे आणि इतक्मया लोकांसाठी एकच तहसीलदार आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बेळगाव जिल्ह्यात 19 तालुके होण्याची शक्मयता आहे. मुख्यमंत्री जिल्ह्याचे विभाजन जाहीर करण्याच्या उद्देशाने आले होते. परंतु अनेक शिष्टमंडळ आले असल्याने त्यांनी त्याबद्दल विचार केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.