For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटीडी बुथ चालक ते राज्याचे मंत्री... प्रकाश आबिटकर

01:04 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
एसटीडी बुथ चालक ते राज्याचे मंत्री    प्रकाश आबिटकर
From STD booth operator to state minister... Prakash Abitkar
Advertisement

तत्कालीन मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांची पूर्ती
प्रकाश आबिटकर सलग तिसऱ्यांदा आमदारपदी
कोल्हापूर
एका साखर कारखाना कामगारांच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलग्याने एसटीडी बुथ चालक, आमदार, उत्कृष्ट संसदपटू ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असा रोमांचकारी प्रवास आमदार प्रकाश आबिटकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आबिटकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने राधानगरी मतदारसंघ उत्साहाचे वातावरण आहे.

Advertisement

भाई आनंदराव आबिटकर गरिबांच्या हक्काकरिता लढणारे चळवळीतील नेते, समाजकारणाचा वसा घरात असला तरी पैश्याची कमतरता असलेले हे घर. पण सकाळपासून ते रात्रीपर्यंत समाजासाठी राबणारी ही मंडळी कधी सत्तेला चिकटून राहिली नाहीत. सत्ता असो अथवा नसो सतत राबणे हेच ध्येय ठेवून यांची वाटचाल चालू राहिली. भाई आनंदराव आबिटकर यांचे सुपुत्र हीच ओळख त्यांची होती, शिकत असतानाचा त्यांनी गारगोटी बसस्थानक व बारदेस्कर पेट्रोल पंपावर एसटीडी बुथ घातला. रात्री बारा पर्यत एसटीडी चालवणारा हा युवक लोकांच्या सेवेतही सक्रीय राहिला.

आबिटकर यांनी युवा स्पोर्ट्स या मंडळाची स्थापना केली या माध्यमातून तालुक्यातील शेकडो युवकांना एकत्र केले, गारगोटीतील प्रसिद्ध गणेशोत्सव साजरा करण्यात या मंडळाचा कायमच हातखंडा राहिला आहे. बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य, प्राचार्य अर्जुन आबिटकर, अजित आबिटकर यांच्या साथीने त्यांनी संघटना बळकट केली त्यातूनच गारगोटी पंचायत समिती अपक्ष लढवून जिंकली व पंचायत समितीचे उपसभापती झाले. पंचायत समितीमधील अग्रेसर कामामुळे त्यांची ओळख संपूर्ण जिह्यात झाली.
गारगोटी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये त्यांनी कामाचा ठसा उमटवून छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी झाले.

Advertisement

अविरत काम करण्याची धडपड असल्यामुळे विविध कामांचा निपटारा करण्यात त्यांनी सातत्याने धडाका लावला. यादरम्यान महाराष्ट्रातील नामंकित मंत्री आणि महनीय व्यक्तींनी गारगोटी शहराला भेटी दिल्या. मतदारसंघाचा लेखाजोखा मांडणारा त्यांची कंदील यात्रा महाराष्ट्रात पोहचली. त्याचीच पोचपावती म्हणून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आणि ते विधानसभेत पोहचले.
आमदार कसा असावा आणि तो काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आबिटकर. महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेच्यावतीने देण्यात येणारा सन 2019-20 सालचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार (विधानसभा) देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देण्यात आला. राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित असणारे सर्व प्रकल्प त्यांनी भगीरथ प्रयत्नांनी मार्गी लावले. त्याचेच फलित म्हणजे त्यांची सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाली.
गारगोटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर विराट मेळावा पाहून प्रभावित झालेल्या शिंदेनी आबिटकर यांना मंत्री करण्याचा शब्द दिला आणि तो खराही केला, स्वातंत्र्यापासून लाल दिव्याचे स्वप्न पाहणारा राधानगरी मतदारसंघ कृतार्थ झाला आणि आमदार प्रकाश आबिटकर मंत्री झाले.

कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार
आमदार प्रकाश आबिटकर यांचे वेगळेपण म्हणजे जिह्यात त्यांनी कुण्याच्याही नेतृत्वाचा आपल्यावर शिक्का मारून घेतलेला नाही. परिणामांची भीडभाड न बाळगता कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून थेट भिडणे हेच त्यांचे कौशल्य असून सर्व इतिहास मोडत ते तिसऱ्यांदा आमदार होऊन मंत्री झाले

नामदार प्रकाश आबिटकर सामाजिक व राजकिय सेवा
सन 1997 ते 2002 : सदस्य, पंचायत समिती, भुदरगड.
सन 1997 ते 1998 : उपसभापती, पंचायत समिती, भुदरगड.
सन 2002 ते 2007 : सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर
सदस्य, स्थायी समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर
सन 2008 : संचालक, भूविकास बँक, कोल्हापूर.
सन 2014 ते 2019 : विधानसभा सदस्य, 272, राधानगरी विधानसभा मतदारसंघ.
सन 2019 ते 2024 : विधानसभा सदस्य, 272, राधानगरी विधानसभा मतदार संघ.
सन 2024 ते 2029 : विधानसभा सदस्य, 272, राधानगरी विधानसभा मतदारसंघ.
2024 कॅबिनेट मंत्रीपद

पुरस्कार 
1. उत्कृष्ठ जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजर्षी शाहू पुरस्कार.
2. आर.आर.पाटील फौंडेशन, महाराष्ट्र राज्य प्रस्तुत लोकमत विधिमंडळ पुरस्कार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार (विधानसभा सदस्य).
3. 8 व्या भारतीय छात्र सांसदमध्ये आदर्श युवा आमदार पुरस्कार.
4. उपाध्यक्ष, कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे (श्ण्ARिं) (मंत्री दर्जा)
5.अध्यक्ष, सेवा प्रवेश मंडळ (कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे)
6. महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेच्या वतीने देण्यात येणारा सन 2019-20 सालचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार (विधानसभा) देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

Advertisement
Tags :

.