For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | मुरगूड तलाव परिसर ते कोल्हापूरचे लॉज... ६ महिने तरुणीसोबत नेमकं काय घडत होतं? ४ नराधमांच्या कृत्याने कोल्हापूर जिल्हा स्तब्ध!

11:46 AM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   मुरगूड तलाव परिसर ते कोल्हापूरचे लॉज    ६ महिने तरुणीसोबत नेमकं काय घडत होतं  ४ नराधमांच्या कृत्याने कोल्हापूर जिल्हा स्तब्ध
Advertisement

                               तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चौघे अटकेत

Advertisement

मुरगूड -महाविद्यालयासाठी ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीला अश्लिल फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी राधानगरी तालुक्यातील आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे), रणजित संभाजी मुधोळकर (वय २९, रा. सोळांकूर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (बय २४, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवडे) या चौघा आरोपींना मुरगूड पोलिसांनी वेगाने हालचाली करत आदित्य शेटके,रणजित मुधोळकर,प्रणवगिरी पालकर,विक्रम पाटील,रात्री उशिरा अटक केली. सुरुवातीचा गुन्हा मुरगूडमध्ये घडल्यामुळे मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित तरुणी पदवीच्याद्वित्तीय वर्षात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सेमिस्टरचे ओळखपत्र तयार करण्यासाठी तिने आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्या मोबाईलवर आपला फोटो पाठवला. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले ब नंतर मुरगूडमध्ये ओळखपत्र आहे असे सांगत मुरगूडातील तलाव परिसरामधील झाडीमध्ये नेले.

तिथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवत त्याने गिरगाव (ता. करवीर) येथील एका लॉजवर नेऊन तिचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपी आदित्यने त्या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकूर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. रणजितने त्या तरुणीला सीबीएस कोल्हापूर येथील एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी त्या तरुणीचीओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्याने तरुणीला स्नॅपचें टवर बोलण्यास भाग पाडले व स्वतःच्या कारमधून घेऊन जाऊन कात्यायनी येथील एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला. तसेच विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) याच्याशीही स्नॅ पचॅटवर बोलण्यास भाग पाडून ओळख वाढवून दिली. त्यानेही पाचगाव येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुरगूड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉज, पाचगावातील लॉज येथे वेळोवेळी पीडितेवर आरोपींनी अत्याचार केले. यावर कहर म्हणजे प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींनी पैशांच्या मागणीचाही तगादा लावला. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलिट केले जाणार नसल्याची धमकीही देऊन पीडितेचा मानसिक छळ करण्यात येऊ लागला. गेल्या सहा हा प्रकार सुरू असल्याची माहिती फिर्यादीमध्ये नोंद केली करण्यात आली आहे. याचा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित तरुणीने सोमवारी दि. १ रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात स्वतः येऊन सपोनिक क्रांती पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली.

सात महिन्यांपासूनया फिर्यादीवरून मुरगूड पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत. दरम्यान, चौघाही आरोपींना कागलच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता सर्व आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.

प्रणावगिरी पालकर उच्च शिक्षित
या प्रकरणातील प्रणावगिरी पालकर हा उच्च शिक्षित आहे. त्याने केलेल्या कृत्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे. तर काही आरोपी राजकीय हितसंबंध असणाऱ्या नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे असल्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरु अल्याची चर्चा आहे.
पोलीस अधीक्षक मुरगूडात या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी मुरगूड पोलीस ठाण्याला सकाळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

तपास सखोल झाला तर..
यातील काही आरोपींनी अशाच प्रकारचे अनेक कारनामे केल्याची आता चर्चा सुरु आहे. यातील पीडित तरुणी तक्रारीसाठी पुढे आल्या तर पोलीस तपासात अनेक प्रकरणे उघड होतील. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

Advertisement
Tags :

.