एका डब्यापासून ते १०० ताटापर्यंतचा प्रवास
कोल्हापूर / राधिका पाटील :
घरची परिस्थिती हालाखीची. पतीच्या उत्पन्नावर संसाराचा गाडा हाकताना ओढाताण व्हायची. यामुळे एका पतसंस्थेत त्या काम करु लागल्या, येथेच एका डब्याची ऑर्डर मिळाली आणि येथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कॅटरिंग व्यवसायात आपली वेगळी ओळख तयार करणाऱ्या गायत्री संत यांची ही यशोगाथा.
अवघ्या एका डव्यापासून १०० लोकांची ऑर्डर तितक्याच चविष्ट पद्धतीने पूर्ण करुन खवैय्यांचे मन आणि पोट तृप्त करणाऱ्या सुगरण म्हणजे गायत्री गिरिष संत. गायत्री संत या एक सर्वसामान्य महिला. मात्र त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी जी यशाची उंची गाठली आहे ती अनेकीसाठी प्रेरणा आहे. गायत्री संत यांचे शिक्षण उगार खुर्द (जि. बेळगाव) येथे झाले. त्यांचे वडील शुगर फॅक्टरीत कामाला तर आई गृहिणी. त्यांचा विवाह कोल्हापूर येथील गिरीष संत यांच्याशी झाला. ते खासगी कंपनीत नोकरीला होते. संसाराला हातभार लावाला या हेतुने त्यांनी कोल्हापुरातील एका पतसंस्थेत १० वर्ष क्लार्क म्हणून नौकरी केली. नोकरी करत असताना
त्यांना एका डब्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी बनवलेले जेवण आवडले आणि हळूहळू जेवणाच्या डब्यांची संख्या वाढु लागली. नोकरी व डबे हे करता करता त्यांची खूप ओढताण गायत्री संत स्वकष्टाने बनल्या अन्नपूर्णा व्हायला लागली. त्यामुळे नोकरी सोडून कॅटरिंगचा कोर्स केला. त्यानंतर पूर्ण वेळ कॅटरिंग व्यवसायासाठी दिला. लोकांना जेवण आवडू लागल्यामुळे आत्मविश्वास वाढला, पण १० माणसांना जेवण किती बनवायचे? दर काय ठरवायचा? याची काहीच कल्पना नव्हती.
याबाबत काही लोकांशी चर्चा करुन त्यांनी यातूनही मार्ग काढला. या सर्व प्रवासात त्यांना त्यांचे पती आणि सासरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला. यामुळे त्यांनी नवनवीन ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. या व्यवसायात मनुष्यबळाची अधिक गरज असते याची त्यांना जाणीव झाली. यातून त्यांनी त्यांन काही लोकांना रोजगार दिला. खाद्यपदार्थांचा व्यवसाय असल्याने चवीबरोबरच सुरक्षिततेचीही काळजी घेणे आवश्यक होते. यामध्ये त्यांना अनेक अडचणीही आल्या कयी ४० ताटांची ऑर्डर असताना ५० ताटांची ऑर्डर पूर्ण होत असे. यामुळे राहिलेल्या दहा ताटांचे जेवण अंगावर पडायचे, यामुळे नुकसान होत असे. पण प्रत्येक अयशस्वी प्रयोग यशाची पायरी असतो हे ब्रीद समोर ठेवून त्यांनी आपल्या व्यवसायात बदल केले. आज १०० लोकांच्या जेवणाची ऑर्डर त्या यशस्वीपणे स्वीकारतात. २५ वर्षे या व्यवसायात यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केली. त्या दिवाळीचा फराळही उत्तमरित्या करतात. त्यांचा फराळ भारतासह अमेरिका, जर्मनी, लंडन येथे पाठवला जातो. त्यांच्याबरोबर स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांनीही शिकून आपला व्यवसाय चालू केला. आजही त्यांच्याकडे नूतन मराठी शाळेचे पोषण आहार, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, बैंक ऑफ इंडियाचे डबे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र या सर्वांची ऑर्डर असते. गायत्री यांचा १० डब्यांपासूनचा प्रवास आता कॅटरिंगच्या व्यवसायापर्यंत पोहोचला आहे