सापापेक्षा विषारी बेडुक
एकाचवेळी 10 जणांना करू शकतो ठार
जगभरात लाखो प्रजातीचे प्राणी आढळून येतात. यातील अनेक प्राणी हे अत्यंत विषारी असतात. सापाला सर्वात विषारी प्राणी मानले जाते. सर्पदंशामुळे कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु एक बेडुक हा सापापेक्षा अधिक विषारी असतो.
सर्वसाधारणपणे घरांच्या आसपास दिसून येणारे बेडुक हे कमी विषारी असतात. परंतु कोलंबियातील शिकारी एका बेडकाच्या विषाचा वापर स्वत:च्या तीरांवर लावण्यासाठी करतात. या बेडकाला रोप आणि विषारी किटकांपासून विष प्राप्त होते.
हा बेडुक अत्यंत विषारी असल्याने केवळ याच्या स्पर्शाने देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. शास्त्रज्ञ आता या बेडकावर संशोधन करत आहेत. या बेडकाच्या मदतीने अनेक प्रकारची औषधे तयार करता येतील असे त्यांचे मानणे आहे. वैज्ञानिक याच्या मदतीने शक्तिशाली पेन किलर तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हा बेडुक पिवळ्या, नारिंगी किंवा हिरव्या रंगाचा असू शकतो. तर ठिकाणांनुसरा याचा रंग वेगवेगळा देखील असू शकतो. हा बेडुक विषारी माश्या, मुंग्या आणि वाळवी फस्त करतो. तर कुठल्याही प्रकारचा धोका जाणवल्यास या बेडकाच्या त्वचेमधून विष बाहेर पडू लागते. हे विष मानवी त्वचेवर लागले तर याचा प्रभाव दिसू लागतो. ज्यानंतर माणसाचा मृत्यू देखील ओढवण्याची शक्यता असते.
अनेक प्रजाती
या बेडकाच्या 100 हून अधिक प्रजाती आहेत. ज्यातील बहुतांश प्रजाती कोलंबियाच्या प्रशांत किनाऱ्यावर वर्षावनाच्या एका छोट्या भूखंडात आढळून येतात. तर छोट्या भूभागातही त्यांचे प्रमाण अधिक आहे. परंतु वर्षावनांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने या बेडकाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे.