For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime News : अकलूज येथे चारित्र्याच्या संशयावरून मित्राचा दगडाने ठेचून खून

01:14 PM May 17, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur crime news   अकलूज येथे चारित्र्याच्या संशयावरून मित्राचा दगडाने ठेचून खून
Advertisement
जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून रक्तरंजित बनाव रचला
अकलूज : माळशिरस तालुक्यातील अकलूज शहरात चारित्र्याच्या संशयावरून एका ५० वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली आहे. जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून आरोपींनी हा रक्तरंजित बनाव रचला. या घटनेमुळे संपूर्ण अकलूज परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत अशोक मुजमुले (वय ५०, रा. संगम नगर, अकलूज) आणि आरोपी हे ओळखीचे होते. सोमवार, ११ मे २०२६ रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास आरोपींनी अशोक मुजमुले यांना फोन करून भेटायला बोलावले. आपल्यामधील जुने भांडण मिटवूया, आपण एकत्र बसून बोलू, असे सांगून आरोपींनी अशोक यांचा विश्वास संपादन केला.
विश्वासापोटी अशोक मुजमुले हे अकलूज औदुंबरनगर रोडवरील ट्रेंड मॉलजवळ आरोपींना भेटण्यासाठी गेले. अशोक मुजमुले घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तू माझ्या पत्नीसोबत का बोलतोस? असे म्हणत आरोपींनी अशोक यांच्यावर चारित्र्याचा संशय व्यक्त केला.
Advertisement

आरोपींनी अशोक यांना शिवीगाळ करत मारहान करण्यास सुरुवात केली. आरोपी वैभव खैरेमोडे याने मोठा दगड अशोक यांच्या डोक्यात घातल्यामुळे अतिरिक्तस्रावामुळे अशोक मुजमुले यांचा जागीच मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे तपास करत आहेत.
Advertisement
Tags :

.