For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नदीमच्या यशात मित्र नीरजचाही वाटा

06:49 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
नदीमच्या यशात मित्र नीरजचाही वाटा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नीरज चोप्रा व अर्शद नदीम हे अनुक्रमे भारत आणि पाकिस्तानमधील जागतिक स्तरावरील दोन उत्कृष्ट भालाफेकपटू आहेत. या दोन शेजारी राष्ट्रांमधील संबंध पारंपरिकदृष्ट्या ताणलेले राहिलेले असले, तरी या दोन्ही खेळाडूंमध्ये मात्र लक्षणीय मैत्रीसंबंध राहिलेले आहेत. त्यातूनच ऑलिम्पिकपूर्वी अर्शदचा भाला खराब झाला असता त्याला नवीन भाला मिळावा यासाठी नीरजने पुढाकार घेऊन प्रयत्न केले होते.

त्यांची मैत्री, जी 2016 मध्ये सुरू झाली ती अॅथलेटिक क्षेत्रामध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी बहरली. नदीमने शक्य तितक्या चांगल्या तयारीने ऑलिम्पिकमध्ये  उतरण्याचे ठरविले होते. मात्र यंदा मार्चमध्ये, ऑलिम्पिकच्या काही महिन्यांपूर्वी नदीमला मोठा धक्का बसला. त्याच्या जवळपास आठ वर्षांच्या अॅथलेटिक प्रवासात त्याचा साथीदार राहिलेला भाला निऊपयोगी ठरला. खेळाडूच्या कामगिरीमध्ये उपकरणांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेता यामुळे एक मोठा धक्का त्याच्या ऑलिम्पिक आकांक्षांना बसला. मदतीची मागणी करूनही त्याच्या राष्ट्रीय महासंघाकडून पाठिंबा मिळू शकला नाही, ज्याने नदीमला एका अनिश्चित स्थितीत आणून ठेवले.

Advertisement

नदीमची कोंडी समजल्यानंतर चोप्राने आपल्या मित्र तथा प्रतिस्पर्धी खेळाडूला मदत करण्यासाठी सक्रिय पाऊल उचलले. ‘अर्शद हा एक अव्वल भालाफेकपटू आहे आणि मला विश्वास आहे की, भालाफेक निर्मात्यांना त्याला प्रायोजित करण्यात आणि त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात अधिक आनंद होईल. हा माझ्याकडून सल्ला आहे’, असे चोप्राने जाहीरपणे सांगितले. चोप्राच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, त्यामुळे नदीमला आवश्यक मदत आणि उपकरणे मिळू शकली. हा हस्तक्षेप नदीमसाठी निर्णायक ठरला, ज्याने पॅरिसमध्ये 92.97 मीटरच्या प्रभावी थ्रोसह पाकिस्तानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले.

नीरजबरोबरची मैदानातील जुगलबंदी तरुणांना प्रेरणादायी : नदीत

इतिहास घडवणारा पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला भारतीय सुपरस्टार नीरज चोप्राबरोबरची त्याची जुगलबंदी या दोन शेजारी देशांमधील क्रिकेटच्या मैदानातील लढाईइतकेच चर्चेत आहे, हे पाहून आनंद झाला आहे. कारण ते दोन्ही देशांतील तऊणांच्या क्रीडा महत्वाकांक्षेला चालना देईल असे त्याला वाटते. क्रिकेट सामने आणि इतर खेळांच्या बाबतीत शत्रुत्व नक्कीच आहे. पण त्याच वेळी एखाद्या खेळाचा पाठपुरावा करणाऱ्या दोन्ही देशांतील तऊणांनी आमचे आणि त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील आदर्शांचे अनुकरण करून देशाला गौरव प्राप्त करून देणे ही चांगली गोष्ट आहे, असे 27 वर्षीय नदीमने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :

.