For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्रानेच मित्राचा धारदार शस्त्राने केला निघृण खून

01:24 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
मित्रानेच मित्राचा धारदार शस्त्राने केला निघृण खून
Friend brutally murdered friend with a sharp weapon
Advertisement

शनिवारी मध्यरात्रीच्या घटनेने दानोळीत खळबळ
संशयितास रात्री उशिरा अटक

Advertisement

कोल्हापूर

दानोळी ता. शिरोळ येथे मित्राने मित्राचा मानेवर, पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष शांतिनाथ नाईक राहणार अंबाबाई मंदिर शेजारी दानोळी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत प्रशांत मारुती राऊत रा. शिवतेज चौक दानोळी असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना 1 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजनेच्या पूर्वी गैबी साहेब दर्गा समोर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असलेल्या मराठा सांस्कृतिक भवन येथे घडली आहे. याप्रकरणी संशयित प्रशांत मारुती राऊत ( रा. शिवतेज चौक, दानोळी) यास जयसिंगपूर पोलिसांनी सायंकाळी उशिरा अटक केली.

Advertisement

याबाबत संशयित आरोपी प्रशांत राऊत यास जयसिंगपूर पोलिसांनी सायंकाळी उशिरा मोठ्या शितातीने ताब्यात घेतले असून पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, वरील वेळ व तारखेस यातील मयत व संशयित आरोपी या दोघांनी मिळून प्रासा कार्पोरेशन ही इम्पोर्ट एक्सपोर्ट ची कंपनी काढलेली असून या कंपनीमध्ये काही नफा होत नसलेले मयत संतोष नाईक हा सदर व्यवसायात लक्ष घालत नसल्याने या कारणावरून दोघांच्यात वाद झाला.

दरम्यान रागाच्या भरात संशयित आरोपी प्रशांत राऊत याने कोणत्यातरी धारदार शस्त्राने संतोष नाईक यांचे मानेवर, पोटावर ,पाठीवर सपासप वार करून खून केला. या घटनेनंतर संशयित प्रशांता पसार झाला होता. या प्रकरणी राजेंद्र श्रीधर नाईक ( वय ६२ रा. दानोळी) जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली.

घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन माहिती घेऊन पंचनामा केला. शिरोळे येथील शासकीय रुग्णालयमध्ये मयत संतोष नाईक यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता पाठवण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपीचा रविवारी सायंकाळी उशिरा शोध घेऊन मोठ्या शितापीने त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. मित्राने जिवलग मित्राचा काटा काढल्याने दानोळी गावात खळबळ माजली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत.

Advertisement
Tags :

.