For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रिजच्या स्फोटाने कुंभारमाठ येथील बिलये कुटुंब हादरले

01:37 PM Jan 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
फ्रिजच्या स्फोटाने  कुंभारमाठ येथील बिलये कुटुंब हादरले
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही.मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या घरात त्यांची पत्नी मीना, आई सुमित्रा आणि त्यांच्या दोन्ही मुली कावेरी मधुरा राहतात. आज अचानक घरातील स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाला. यावेळी हे सर्व मध्य हॉल मध्ये झोपी गेले होते. स्फोट झाल्याचा कानठिळ्या बसणारा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब हादरले. त्यांनी नजीकच्या ग्रामस्थांना पाचारण केले. त्यानंतर घरातील पाण्याच्या साहाय्याने फ्रिज मधील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.