For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावटगिरी रोखण्यासाठी नव्याने नोंदणी अनिवार्य

06:37 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
बनावटगिरी रोखण्यासाठी नव्याने नोंदणी अनिवार्य
Advertisement

गृहलक्ष्मी, गृहज्योती योजनांमध्ये मोठे बदल : अर्ज करणाऱ्यांनाच मिळणार योजनेचा लाभ, नवीन गॅरंटी कार्ड देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांपैकी सर्वात लोकप्रिय असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘गृहज्योती’ या योजनांमध्ये मोठे बदल करण्याची सरकारची योजना आहे. या योजनांमध्ये घुसलेल्या लाखो बनावट लाभार्थ्यांना ओळखून त्यांची नावे यादीतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्याच्या लाभार्थ्यांसह, लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांना नव्याने अर्ज करणे अनिवार्य केले आहे. येत्या काही दिवसांत केवळ अर्ज केलेल्यांनाच लाभ मिळणार आहे. तसेच नवीन गॅरंटी कार्ड  देण्याचा आदेश मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे.

Advertisement

अर्ज कुठे आणि कसे करायचे?

राज्य सरकार लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असून अधिकृतपणे अर्ज प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. बेंगळूर वन, कर्नाटक वन, ग्राम वन केंद्रे आणि ऑफलाईन (प्रत्यक्ष) अर्ज सादर करण्याची परवानगी मिळण्याची शक्मयता आहे. ही नवीन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी गॅरंटी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी यांच्यावर सोपवण्याचा सरकार विचार करत आहे.

नवीन अर्ज प्रक्रिया कशी असेल?

महिला व बाल कल्याण खात्याने गृहलक्ष्मी योजनेसाठी नवीन अर्जाची प्रत यापूर्वीच तयार करून वित्त विभाग आणि मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर केली आहे. नवीन अर्जामध्ये बायोमेट्रिकसोबत (अंगठ्याचा ठसा) प्रामुख्याने 8 ते 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे लाभार्थ्यांसाठी अनिवार्य आहे.

लाभार्थ्यांकडून सरकारविरोधात तीव्र संताप

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्याच्या सरकारच्या आदेशानंतर राज्यभरातील लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चित्रदुर्ग आणि हुबळीसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील महिला राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.

गृहलक्ष्मी योजनेतील अनियमितता

ङ सध्या या योजनेत 1.28 कोटी लाभार्थी.

ङ यापैकी सुमारे 4.30 लाख लाभार्थी आयकर भरणारे.

ङ सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा केले जात असून मृतांच्या खात्यात सुमारे 100 कोटी ऊपये जमा झाल्याची माहिती

ङ काही लोक वेगवेगळे मोबाईल नंबर जोडून बेकायदेशीरपणे पैसे मिळवत असल्याचे उघड

गृहज्योती योजनेतील अनियमितता

ड. सध्या गृहज्योती योजनेंतर्गत 1.68 कोटींहून अधिक लाभार्थी

ङ त्यापैकी प्रत्येकाला पाच-सहा मीटरच्या नावाखाली मोफत वीज सुविधा मिळत असल्याचे उघड

ङ  अनेक नागरिकांची एकाच इमारतीत घर आणि दुकान दोन्ही आहेत.  दुकाने किंवा व्यवसायांना गृहज्योती योजना लागू नाही, केवळ निवासी घरांनाच मोफत वीज पुरवली जात आहे. व्यावसायिकांनी स्वतंत्र मीटर बसवावेत.

ङ कर्नाटक व्यतिरिक्त इतर राज्यांतील लोक येथे राहत असूनही त्यांनाही योजना मिळत आहे का, याचीही होणार खात्री

Advertisement
Tags :

.