महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सुशीला-सुजीत’ चित्रपटात फ्रेश जोडी

06:10 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चित्रपटाचे पोस्टर चर्चेत

Advertisement

नव्या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीकडून अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. स्वप्नील जोशीने आता स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  स्वप्नील या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहे. स्वप्नीलचा ‘सुशीला-सुजीत’ हा चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर स्वप्नीलने शेअर केले आहे.

Advertisement

या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद ओकने सांभाळली आहे. प्रसादने यापूर्वी कच्चा लिंबू, चंद्रमुखी, हिरकणी यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे प्रसाद-स्वप्नीलची जोडी रुपेरी पडद्यावर काय जादू दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशी असे पाच जण मिळून करणार आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article