महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चालकाशिवाय 84 किमीपर्यंत धावली मालगाडी

06:15 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

► वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या कथुका रेल्वेस्थानकावर रविवारी सकाळी अजब चित्र दिसून आले. येथे उभी असलेली एक मालगाडी रेल्वे चालकाशिवायच धावू लागली आणि पाहता पाहता काही क्षणांमध्ये या मालगाडीने वेग पकडला. ही रेल्वे चालकाशिवाय 84 किलोमीटर अंतरापर्यंत धावत राहिली. अखेर पंजाबच्या मुकेरियांमध्ये या मालगाडीला रोखण्यात आले.

Advertisement

मालगाडी क्राँक्रिट घेऊन पठाणकाच्या दिशेने प्रवास करत होती. रेल्वेचा लोकोपायलट (एकप्रकारे चालक) आणि को-पायलट कथुआ स्थानकावर चहा पिण्यासाठी थांबले होते, तेथे कथित स्वरुपात इंजिन सुरू होते. खाली उतरण्यापूर्वी हँडब्रेक ओढण्यास दोघेही विसरले होते.

मालगाडी धावू लागल्यावर ती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यात प्रारंभी यश आले नाही. अखेर प्रवासी रेल्वेंचे चालक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने दसूहा येथे मालगाडी रोखण्यात आली. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आल्याची माहिती जम्मूतील रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article