‘अनकस्टम्ड अर्थ“ सीरिजमध्ये फ्रीडा पिंटो
स्लमडॉग मिलिनेयर फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटोची आगामी वेबसीरिज ‘अनकस्टम्ड अर्थ“चा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. हा फॅमिली ड्रामा असून जो झुम्पा लाहिडीच्या याच नावाच्या शॉर्टस्टोरी कलेक्शनवर आधारित आहे. या सीरिजमध्ये फ्रीडा ही ‘पारुल चौधरी“च्या तर सिद्धार्थ हा ‘अमित“ हे पात्र साकारत आहे.
ही सीरिज कॅम्ब्रिज, बोस्टन आणि मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या अनेक पिढ्यांच्या भारतीय-अमेरिकन समुदायाची कहाणी आहे. ही कहाणी वेगवेगळ्या पिढ्यांदरम्यान प्रेम, नुकसान आपलेपणा आणि नातेसंबंध यासारखे विषय मांडणारी आहे.
फ्रीडाने पारुल चौधरी ही भूमिका साकारली असून ती एक पत्नी आणि आई आहे, जिने कधी स्वत:च्या पित्याच्या इच्छेचा आदर करण्यासाठी स्वत:च्या कॉलेज रोमान्सचा त्याग केला होता. कॅन्सरचे निदान झाल्यावर पारुल स्वत:च्या परिवाराला भारतातून परत कॅम्ब्रिजमध्sय आणते. स्वत:च्या आजाराला तोंड देत पारुल कधीकाळी त्यागलेले जीवन पुन्हा जगण्याचा निर्णय घेते. तिच्या निर्णयांचा प्रभाव तिचा परिवार आणि तिच्या आसपासच्या मोठ्या स्थलांतरित समुदायावर पडतो.
फ्रीडा पिंटो आणि सिद्धार्थसोबत सीरिजमध्ये इंद्रनील सेनगुप्ता, परवीन कौर, सरायु ब्लू, जस्टिन बार्थ, आदि रॉय, आइला सुंदरसिंह मॅकेग, जयंत कृपलानी हे कलाकार दिसून येणार आहेत. ‘3 बॉडी प्रॉब्लेम“ आणि ‘द नेवर्स“च्या कामासाठी ओळखली जाणारी माधुरी शेखर या सीरिजची लेखिका आणि शो-रनर आहे. तर जॉन वेल्स, झुम्पा लाहिडी, निशा गनात्रा, एरिका सालेह, एरिन जोंटो आणि सेलिया कोस्टास यांनी सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे.
रितेश बत्राने पहिले दोन एपिसोड दिग्दर्शित पेले आहेत. अनकस्टम्ड अर्थ या सीरिजची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजनकडून करण्यात आली आहे. ही सीरिज 17 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
