महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणातही भाजपकडून ‘फ्रीबीज’

06:22 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / चंदीगढ

Advertisement

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या पक्षांप्रमाणे भारतीय जनता पक्षानेही हरियाणाच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ‘फ्रीबीज’ किंवा विनामूल्य आश्वासनांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनी यासंबंधी अनेक घोषणा केल्या आहेत. नुकतीच महाराष्ट्राच्या महायुती सरकारने लाडकी बहीण आणि इतर योजना घोषित केल्या आहेत.

Advertisement

येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या सर्व निवडणुका सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘विनामूल्य’च्या घोषणा करण्याची स्पर्धाच लागलेली आहे. भारतीय जनता पक्षही या स्पर्धेत उतरला आहे.

हरियाणात भाजप काय देणार

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अनेक योजना घोषित केल्या आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर 500 रुपयांना देण्याचे आश्वासन नुकतेच देण्यात आले आहे. अन्य मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअरच्या मर्यादेत वाढ करुन ती 6 लाख रुपयांवरुन 8 लाख रुपयांपर्यंत नेण्याची घोषणा जुलैमध्ये करण्यात आली आहे. पंचायती राज संस्था आणि नगरपालिकांमध्ये अन्य मागासवर्गीयांसाठी ब गट निर्माण करुन 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

नमो ड्रोन दीदी योजना

कृषीच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ड्रोन दीदी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या स्वयंसाहाय्य गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. त्यासाठी ड्रोनच्या किमतीच्या 80 टक्के किंवा अधिकतम 8 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. महिलांच्या स्वयंसाहाय्य गटांमधील काही सदस्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ओबीसींकडे लक्ष

हरियाणाचे राजकारण प्रामुख्याने जाट समाजाभोवती फिरते. तथापि, त्या राज्यात अन्य मागासवर्गीयांची संख्या 40 टक्के इतकी मोठी आहे. या समुदायाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सुरु केला आहे. या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी हे अन्य मागासवर्गीयांमधील आहेत. आमच्याच पक्षाने या देशाला प्रथम पूर्णवेळ अन्य मागासवर्गीय नेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळवून दिला, असे गेल्या महिन्यात येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिपादन केले होते. एकंदर आता भारतीय जनता पक्षासह सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article