गैरवापरामुळे मोफत पाणी योजना बंद करावी लागली
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
तिसवाडी : पिण्याचे पाणी ही मौल्यवान गोष्ट असून त्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. गोव्यात 1 घन लीटर पाण्याचा दर 20 ऊपये आहे. तरीदेखील जनतेला 4 ऊपयात देण्यात येते. शिल्लक रक्कम सरकारकडून भरली जाते. पूर्वी 16 हजार लीटर पाणी मोफत दिले जायचे, परंतु काही जणांनी चार मीटर बसवून याचा गैरवापर केला, म्हणून मोफत पाणी योजना बंद करावी लागली, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आगशी येथील सेंट लॉरेन्स पंचायतीच्या सभागृहात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते आगशी आणि नावशी गावांत 21 कोटी ऊपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या टाक्यांमुळे दोन्ही गावांतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघणार आहे. या दोन्ही टाक्यांबद्दल आमदार बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
मिठागरांच्या संवर्धनासाठी धोरण आखणार
राज्यातील मिठागरांचे संवर्धन करण्याची आवश्यकता असून जैविविधता मंडळाला त्यासाठी धोरण तयार करण्याची सूचना करणार आहे, तसेच मानशींची बांधणीदेखील हाती घेण्यात येईल., असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.