For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक दुर्बल हृदय रुग्णांवर मोफत उपचार

10:26 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक दुर्बल हृदय रुग्णांवर मोफत उपचार
Advertisement

100 अँजिओग्राफी, 25 अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करणार

Advertisement

बेळगाव : केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त 100 गरजू रुग्णांची अँजिओग्राफी व 25 जणांवर अँजिओप्लास्टी मोफत करण्यात येणार आहे. केएलई इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद यांनी सोमवारी ही माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. एम. दयानंद पुढे म्हणाले, आर्थिक मागास व कोणत्याही सरकारी योजनांचे लाभार्थी नसणाऱ्यांसाठी कुटुंबापासून वंचित ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून नावे नोंदणी सुरू आहे. प्रथम येणाऱ्या 100 गरजू व पात्र रुग्णांवर मोफत अँजिओग्राफी व 25 रुग्णांवर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. यावेळी हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय पोरवाल, हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश पट्टेद, डॉ. आर. बी. नेर्ली, डॉ. राजशेखर सोमनट्टी, डॉ. समीर अंबर, डॉ. प्रसाद एम. आर., डॉ. विश्वनाथ हेसरूर आदी उपस्थित होते.

कमी रक्तदाब, मूत्रपिंड, यकृत व नसांच्या आजाराने रुग्ण त्रस्त असू नये. गरजूंना केवळ एक स्टंट मोफत बसविण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक ब्लॉक आढळून आल्यास त्यांना स्टंट घातले जाणार नाही. यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, आभा कार्ड आणणे सक्तीचे आहे. कोणत्याही आरोग्य विमा किंवा सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना ही योजना लागू होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. संजय पोरवाल म्हणाले, हृदय रोगावर उपचार खर्चिक आहे. अनेकांना उपचाराची गरज असूनही खर्च परवडत नाही म्हणून सोने गहाण ठेवून किंवा कुठून तरी कर्ज काढून उपचारासाठी येतात. अशा गरजू रुग्णांसाठी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 अँजिओग्राफी मोफत करण्यात येणार आहेत. पैशांविना उपचार थांबविणाऱ्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.