70 लाख ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास
कोल्हापूर / विनोद सावंत :
कोल्हापूर एसटी विभागांतर्गत असणाऱ्या 12 आगारात वर्षभरात 75 वर्षावरील तब्बल 69 लाख 95 हजार 185 ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून फुकट प्रवास केला आहे. राज्यशासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे हे शक्य होऊ शकले आहे. यातून 31 कोटी 79 लाख 91 हजार 152 इतके उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास मिळालाच शिवाय तोट्यात असणाऱ्या एसटीला हक्काचे प्रवासी मिळून उत्पन्नातही भर पडली.
देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एसटी महामंडळाचे तत्कलिन अध्यक्ष तथा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे 75 वर्षावरील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची संधी मिळाली. एसटीलाही हक्काचे प्रवासी मिळाले. ज्येष्ठ नागरिकांच्या तिकटाचे पैसे राज्यशासन एसटीला देत आहे. त्यामुळे ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरली आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना मिळाली नवी उमेद
काही ज्येष्ठ नागरिक एकटे आणि एकाकी जीवन जगतात. काहीजण वृद्धाश्रमांत राहत असतात. अशा सामाजिक परिस्थितीत अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लाभदायी ठरली आहे. एसटीच्या मोफत प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिक पर्यटन करू लागले आहेत. ज्येष्ठांना जगण्याची नवी उमेद या योजनेमुळे मिळाली, म्हटले तर वावगे ठरणार नाही.
- ज्येष्ठ नागरिक यासाठीही मोफत करतात प्रवास
गावांमध्ये आठवडा बाजारात खरेदीला जाण्यासाठी, मुलींसह नातेवाईकांना भेटण्यासाठी, पाहण्याचे कार्यक्रमासाठी, औषध उपचारासाठी परगावी जाण्यासाठी, देवदर्शनाला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी
- राज्यभरातून 1500 कोटींचा महसुल जमा
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून ऑगस्ट 2022 ते मार्च 2024 पर्यंत सुमोर 1500 कोटींचा महसूल एसटीला मिळाला आहे. सुमारे 29 कोटी प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे.
एसटी महामंडळाने 26 ऑगस्ट 2022 मध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला सुरवात केली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2024 मध्ये 75 वर्षावरील 69 लाख 95 हजार 185 ज्येष्ठ नागरिकांना या योजनाचा लाभ घेतला आहे. यातून एसटीलाही 31 कोटी 79 लाख 91 हजार 152 उत्पन्नही मिळाले.
संतोष बोगारे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी कोल्हापूर
- एप्रिल ते डिसेंबर 2024 मधील अमृत ज्येष्ठ नागरिक योजनाची स्थिती
महिना मोफत प्रवास केलेल्या लाभाथी उत्पन्न
एप्रिल 5 लाख 74 हजार 479 23797540
मे 5 लाख 22 हजार 767 23153405
जुन 5 लाख 82 हजार 976 23996845
जुलै 6 लाख 238 27884365
ऑगस्ट 18 लाख 76 हजार 151 85098487
सप्टेंबर 6 लाख 27 हजार 144 28137235
ऑक्टोंबर 8 लाख 5 हजार 131 36865570
नोव्हेंबर 6 लाख 44 हजार 592 33420545
डिसेंबर 7 लाख 28 हजार 907 35637160
एकूण 69 लाख 95 हजार 185 31,79,91,152
- आगारनिहाय लाभार्थी
आगार लाभार्थी
कोल्हापूर 8 लाख 64 हजार 165
संभाजीनगर 8 लाख 19 हजार 889
इचलकरंजी 6 लाख 22 हजार 51
गडहिंग्लज 5 लाख 49 हजार 534
गारगोटी 9 लाख 13 हजार 700
मलकापूर 2 लाख 54 हजार 800
चंदगड 2 लाख 32 हजार 419
कुरूंदवाड 4 लाख 41 हजार 746
कागल 4 लाख 87 हजार 428
राधानगरी 6 लाख 45 हजार 45
गगनबावडा 1 लाख 2 हजार 619
आजरा 3 लाख 32 हजार 802