For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोरजी पंचायतीतर्फे शेतजमिनींची मोफत नांगरणी

03:24 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोरजी पंचायतीतर्फे शेतजमिनींची मोफत नांगरणी
Advertisement

पंचायतीतर्फे तीन यंत्रांचा वापर करून भातशेती नांगरली, 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतला लाभ, युवा पिढीचाही शेतीकडे कल

Advertisement

मोरजी : मोरजी पंचायतक्षेत्रातील सर्व शेती नांगरून देण्यासाठी पंचायतीने तीन यंत्राचा वापर केला आहे. सुमारे 100 पेक्षा जास्त शेतकरी याचे लाभधारक आहेत. सरपंच मुकेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायतीमार्फत मोफत भातशेती नांगरून देण्याची योजना सुरू आहे. यासाठी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त खर्च शेतकऱ्यांसाठी मोरजी पंचायत मंडळ करत आहे.मोरजी पंचायतीच्या मालकीचा एक ट्रॅक्टर भातशेती नांगरण्यासाठी उपलब्ध आहे.शिवाय गावातील दोन ट्रॅक्टर मोरजी पंचायत मंडळांनी भाडेपट्टीवर घेऊन सर्व शेतकऱ्यांची मोफत भातशेती नांगरून देण्याची योजना आखली त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सुऊवातीला माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी मर्डीवाडा मोरजी  येथील आपल्या प्रभागात मागच्या सात वर्षापासून मोफत शेती नांगरून देण्याची योजना आखली होती.आता पूर्ण मोरजी गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना पंचायतीमार्फत राबविली जात आहे. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना मोफत भातशेती नांगरून देण्यासाठी पॉवर टिलर ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. पूर्वी मोरजी भागात शेतकरी पारंपरिक पद्धतीने नांगरणी करून शेती करत होते. आता त्या पद्धतीला फाटा देत आधुनिक यंत्राद्वारे नांगरणी करत शेती केली जाते. आता नांगरणीसाठी जनावरे तसेच मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्राकडे वळले आहेत. युवा पिढीही शेतीकडे वळताना दिसत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.