लोककल्प फाऊंडेशनतर्फे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर
10:43 AM Sep 20, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व नंदादीप आयकेअर हॉस्पिटल यांच्यावतीने चापोली गावामध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाने खानापूर तालुक्यातील 32 दत्तक गावांमध्ये ही शिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिरात एकूण 82 जणांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. याप्रसंगी नंदादीपचे डॉक्टर, पीआरओ आनंद, लोककल्पचे प्रितेश पोतेकर आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article