सावंतवाडीत मिळणार आता mpsc चे मोफत धडे
व्हेरेनियम क्लाऊड लिमिटेडचा उपक्रम ; १५० गुणवंतांना मिळणार फ्री क्लासेस
सावंतवाडी -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हेरेनियम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता पुढचं पाऊल म्हणून MPSC 2024 ची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याततील तरुण-तरुणी उच्चस्तरीय अधिकारी व्हावेत यासाठी एमपीएससी परीक्षेसाठी क्लासेस सुरू करण्यात येत आहेत. तसेच खास स्कॉलरशिप परीक्षाही घेतली जाणार आहे. या माध्यमातून एमपीएससीची पूर्ण तयारी आताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातच करून घेतली जाणार आहे. त्यासाठी दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत क्लासेसची खास सुविधा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी 25 डिसेंबर संध्याकाळी 6 पर्यंत https://forms.gle/S44XqXbCubhnmgEr9 या वेबसाइट वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण- तरुणींनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन कंपनीच्या वतीनं करण्यात आलंय.कोकणवासीयांच्या प्रेमाखातर कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले आहेत. आज व्हेरेनियम क्लाऊड लिमिटेड मुळे अनेक गरजू तरुण-तरुणींना कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.१२ फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वप्रथम कोकणातील या उपक्रमाची सुरुवात झाली. आपल्या कोकणवासियांसाठी काहीतरी करावं या उद्देशानेच त मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस कंपनी ने तयार केला.