Pandharpur Crime News | पंढरपुरात तडीपार गुंडांचा मुक्त संचार; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
जिल्हाबंदी आदेश झुगारून शहरात वावरणाऱ्या गुंडांना बेड्या
पंढरपूर -वाळू तस्करी, जुगार, मटका, सावकारी अशा बेकायदेशीर बंद्यामुळे पंढरपूर शहरातील गुंडगिरी वाढतच आहे. तडीपार करण्यात आलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार चक्क मोकाट गावात फिरत आहेत.
गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या आदेशान्वये हद्दपार करून अंमलबजावणी केलेले असतानाही विना परवाना पुन्हा पंढरपुरातच वावरणाऱ्या चौघांना पकडून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ८ व ९ मार्च अशा दोन दिवसांत ही कारवाई केल्याची माहितीवरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्थेला बाधा शक्यता असल्याने पोहोचण्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीच्यालोकांना हद्दपार केले जाते. संबंधित पोलीस ठाण्यांकडून संशयितांना पकडून आदेशाची अंमलबजावणी केली जाते. त्यानंतर काही दिवसांतच अनेकजण आदेशाचा भंग करून परत आपल्या घरी, शहरात वावरत असल्याचे समोरयेत आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात चौघे आढळून आल्याने त्यांना पकडून गुन्हे दाखल करण्यात आले.आदित्य रामचंद्र छापछडी (वय २४, रा. सेंट्रल नाका) याला जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी २ फेब्रुवारी रोजीच्या आदेशाने सहा महिन्यांकरिता सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. रविवारी ८ फेब्रुवारी दुपारी तो घराजवळ पोलिसांना सापडला. शिवा रामा इंदापूरकर (वय २६, म.डोंबे गल्ली) याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने हद्दपार केलेले होते.
मात्र, रविवार, ८ मार्च रोजी सायंकाळी तो नगरपालिका शाळा नं. ४ जवळ आढळून आला. कौस्तुभ ऊर्फ दर्शन सतीश बंडगर (वय २१, रा. गांधी रोड)याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एक वर्षाकरिता हद्दपार केलेले होते. तरीही तो रविवार, ८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मटन मार्केटजवळ फिरताना पोलिसांना सापडला.शुभम काळू पवार (वय २३, रा. पद्मावती झोपडपट्टी) याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडील ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या आदेशाने दोन वर्षांकरिता सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो सोमवार, ९ मार्च पहाटे पद्मावती उद्यानाजवळ पोलिसांना सापडला. वरिष्ठ पो.नि. दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.