For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्हावेलीत ग्रामस्थांच्या दारी मोफत फिरता दवाखाना

12:12 PM Mar 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
न्हावेलीत ग्रामस्थांच्या दारी मोफत फिरता दवाखाना
Advertisement

वैद्यकीय तपासणीसह औषधोपचाराचा शुभारंभ

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सोयीसुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करुन देण्यासाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि मुंबईतील योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफर साऊथ या दोन संस्था सरसावल्या आहेत.या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने न्हावेली गावात विशेष गाडीद्वारे मोफत फिरता दवाखाना हा महत्वपूर्ण आरोग्य उपक्रम सुरू करण्यात आला असून यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. हा फिरता दवाखाना दर सोमवारी आणि गुरुवारी न्हावेली ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे.ग्रामस्थांच्या सोयीसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले असून न्हावेली शाळा नं.४ येथे सायंकाळी ३ ते ३.४५ या वेळेत रुग्ण तपासणी होईल तर त्यानंतर सायंकाळी ४ ते ४.४५ या वेळेत न्हावेली ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ही वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांची केवळ तपासणीच केली जाणार नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व औषधे देखील पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत.आजच्या वाढत्या महागाईच्या काळात वैद्यकीय सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात असताना सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना या योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे.या सुविधेचा लाभ घेऊ इच्छीणारा रुग्णांनी पहिल्या वेळेस येताना आपले आधारकार्ड किवा आधारकार्ड क्रमांक सोबत आणणे अनिवार्य आहे.जेणेकरुन रुग्णांची रितसर नोंदणी करता येईल अधिक माहितीसाठी नागरिकांनी ९४२१९५३८०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी ग्रामपंचायत सरपंच अष्टविनायक धाऊसकर,उपसरपंच अक्षय पार्सेकर,ग्रामपंचायत सदस्य संतोष नाईक,आरती माळकर,स्नेहा पार्सेकर,आणि समस्त ग्रामस्थांनी या आरोग्यदायी उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.गावातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले असून या उपक्रमामुळे न्हावेली परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.