जगन्नाथपुरी मंदिरात मोफत महाप्रसाद वाटपाची योजना
ओडिशा सरकारचा निर्णय : लवकरच कार्यवाही होणार
► वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशा सरकारने जगन्नाथपुरी मंदिरात भाविकांना मोफत महाप्रसाद वाटप करण्याचा विचार करत आहे. ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचरण यांनी रविवारी यासंबंधीची माहिती दिली. ही योजना लवकरच लागू केली जाईल. या योजनेंतर्गत सरकार दरवषी 15 कोटी ऊपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या काही भाविकांना या योजनेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पृथ्वीराज हरिचरण यांनी सांगितले.
पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरात भाविकांना ‘महाप्रसाद’ मोफत वाटण्याची योजना लवकरच कार्यान्विति होणार असल्याचे हरिचंदन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाप्रसाद मोफत वाटण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास सरकारवर वर्षाला 14 ते 15 कोटी ऊपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना सफल करण्यासाठी आम्ही काही आर्थिकदृष्ट्या श्रीमंत भाविकांना या योजनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. काहींनी या उपक्रमात सहकार्य करण्याचे आधीच मान्य केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोफत महाप्रसाद वाटपाचा हा उपक्रम ‘कार्तिक’ या पवित्र ओडिया महिन्यानंतर राबविला जाण्याची शक्मयता आहे. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यात विशिष्ट विधी करणाऱ्या महिलांसाठी ‘हबिसयाली’ विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जगन्नाथ मंदिराचे सार्वजनिक दर्शन आयोजित करण्याची योजना सुरू केली आहे. बाराव्या शतकातील या मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समर्पित यंत्रणा उभारण्यात येणार आहे.