उभादांडा येथे मोफत हृदयविकार आरोग्य तपासणी शिबीर
माझा वेंगुर्ला संस्थेचे आयोजन ; ५० रुग्णांनी घेतला लाभ
वेंगुर्ले (वार्ताहर)-
माझा वेंगुर्ला संस्था, प्रा. एस.एन. ओझा फाऊंडेशन आणिन मॅनकाईड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभादांडा येथील आरोग्यधाम येथे आयेजित केलेल्या मोफत हृदय विकार आरोग्य तपासणीचा ५० रूग्णांनी लाभ घेतला.माझा वेंगुर्ला संचलित आरोग्यधाम उभादांडा येथे मोफत हृदय विकार आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सर्व रूग्णांची रक्त तपासणी, ईसीजी काढण्यात आले. त्याचप्रमाणे त्योना औषधेही पुरविण्यात आली. या तपासणी वेळी झालेल्या सर्व तपासण्या व औषधे रूग्णांना मोफत देण्यात आली. या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन प्रसंगी रूग्णांना माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माझा वेंगर्ला संस्थेचे उपाध्यक्ष राजन गावडे, दादा साळगांवकर, रमेश नार्वेकर, डॉ. अनंत सामंत, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मॅनकाईड कंपनीचे श्री. धुरी, आरोग्य सेविका सौ. धुरी आदींचा समावेश होता.