For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा कारागृह अधिकाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

09:46 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा कारागृह अधिकाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
Advertisement

बेळगाव : मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 200 हून अधिक जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. श्री ऑर्थो व ट्रॉमा सेंटरच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री ऑर्थोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आय. देवगौडा यांच्या उपस्थितीत व कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोटेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे दीपप्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

यावेळी बोलताना डॉ. देवगौडा म्हणाले, प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. उत्तम आरोग्याशिवाय दुसरी संपत्ती नाही. त्यामुळेच आरोग्य रक्षणाच्यादृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. अतिरक्तदाब, मधुमेह, संधिवात, पाठदुखी, चर्मरोग आणि हाडांची ठिसुळता आदी तपासण्या करून मोफत औषधे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोट्रेश यांनी डॉ. देवगौडा यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कारागृहाचे प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, डॉ. यासीन कालकुंद्री, राजू तिप्पन्नावर व कारागृहाचे अधिकारी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.