सांगेलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर
लोकमान्य सोसायटी व लोककल्प फाउंडेशन यांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लोककल्प फाउंडेशन आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जून २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ या वेळेत तालुक्यातील सांगेली ग्रामपंचायत परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात कान व घसा तपासणी, हृदयरोग तपासणी, बालरोग तपासणी, तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत.शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या तपासण्या पूर्णपणे विनामूल्य असून, ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच स्वतःसह आपल्या कुटुंबीयांचाही लाभ व्हावा यासाठी गावातील नागरिकांनी जागरूक राहून या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.