लोककल्प-अरिहंत हॉस्पिटलतर्फे बैलूर येथे मोफत आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशन व अरिहंत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बैलूर गावात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. अरिहंत हॉस्पिटल हे दीक्षित हेल्थकेअर प्रा. लिमिटेडचे युनिट असून हे 100 खाटांचे हॉस्पिटल आहे, जेथे सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. सदर शिबिरामध्ये बीपी, शुगर, ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. तसेच जनरल हेल्थ तपासणी करण्यात आली. अरिहंतच्या डॉ. सुधा, नर्सिंग स्टाफ स्वाती व शरण्या, समन्वयक शिवराज काटापूर यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला. त्यांना लोककल्पचे अनिकेत पाटील, संदीप पाटील, संतोष कदम यांचे सहकार्य लाभले. यावेळी लक्ष्मण झांजरे, तुकाराम बिर्जे, ग्रा. पं. उपाध्यक्षा रेणुका सुतार, सदस्य कांचन बिर्जे, बैलूर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते. 110 हून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.