For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

04:58 PM Jan 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संतोष कोदे, मित्रमंडळ आणि शिवसेना आचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या मोफत आरोग्य शिबीराचे उदघाट्न शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे, उपतालुका प्रमुख मंगेश गांवकर,विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर,आचरा सरपंच जेरॉन फार्नांडिस यांचा हस्ते करण्यात येणार आहे.या शिबिरात जनरल मेडिसिन-नेफ्रोलौजीस्ट, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोगतज्ञ, स्त्री-रोगतज्ञ आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी आचरा पंच क्रोशीतील जास्तीत जास्त रूग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष कोदे, मित्र मित्रमंडळ आणि शिवसेना आचरा विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.